HW News Marathi
राजकारण

अर्थसंकल्पीय अधिवेशन ‘या’ तारखेला मुंबईत होणार

नागपूर | विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आज राष्ट्रगीताने संस्थगित करण्यात आले. पुढील अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget Session) २७ फेब्रुवारी २०२३ रोजी विधानभवन, मुंबई येथे होणार असल्याची घोषणा  उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Deputy Chairman Dr. Neelam Gorhe) यांनी विधान परिषदेत तसेच अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी विधानसभेत केली.

या हिवाळी अधिवेशनात दोन आठवड्याचे नियोजित केले होते.  दोन वर्षांच्या कोरोना संकट कालावधीनंतर नागपूर येथे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन पार पडले. मुख्यमंत्री या नात्याने माझे हे पहिलेच अधिवेशन. या अधिवेशनात 12 विधेयके मंजूर मंजू करण्यात आहे, असे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

या अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून ते शेवट दिवसापर्यंत विरोधकांनी विधीमंडळाच्या पाऱ्यांवर सरकारविरोधात आंदोलन आणि घोषणाबाजी दिली. परंतु, यंदाच्या अधिवेशनात पहिल्यात विरोधकांसोबत सत्ताधारी देखील विधीमंडळाच्या पाऱ्यांवर विरोधकांविरोधात आंदोलन आणि बॅनर घेऊन घोषणा देत होते. या अधिवेशनात अभिनेता सुषात सिंह राजूपतची मॅनेजर दिशा सालियन आत्महत्याप्रकरणी एसआयटी चौकशी करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

 

 

 

Related posts

मध्य प्रदेशात कमलनाथ यांचे अभिनंदन करणारे बॅनर्स

News Desk

राज ठाकरेंनी कार्टूनमधून उडवली शिवसेनेची खिल्ली

Adil

मी निवडणूक जिंकणारच आहे, तुमच्याशिवाय किंवा तुमच्यासोबत !

News Desk