HW News Marathi
राजकारण

धनंजय मुंडेंचा आज जालना, बीड जिल्ह्यात गारपीट भागाचा दौरा

परळी वै. | रविवार दि.11 रोजी झालेल्या गारपीट आणि वादळी वार्‍यामुळे शेतीच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे हे बुधवार दि.14 फेब्रुवारी रोजी जालना आणि बीड जिल्ह्याचा दौरा करणार असुन, या दौर्‍यात ते मंठा व गेवराई तालुक्यातील नुकसानग्रस्त गावांना भेटी देवुन शेतकर्‍यांशी संवाद साधणार आहेत.
सकाळी 9 वाजता ते मंठा तालुक्यातील किर्तापुर, खोरवड, पुसवद व देवठाणा तर दुपारी 12 वाजता गेवराई तालुक्यातील खळेगांव, उमापुर, धोंडराई परिसरातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करून शेतकर्‍यांशी सुसंवाद साधणार आहेत. धोंडराई गावाजवळ दरोडा पडलेल्या वस्तीला ही ते भेट देऊन दहशदग्रस्त कुटुंबियांची भेट घेणार आहेत. यावेळी त्यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आ.अमरसिंह पंडित, पंकज नाना बोराडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठा आरक्षणासाठी राजीनामा देईन

News Desk

महाराष्ट्रात विविध ठिकाणी पावसाने थैमान घातल्यामुळे MNS ने उद्याचा मेळावा पुढे ढकलला

Aprna

मुख्यमंत्र्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहिली

News Desk