HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

सभेतील कमी गर्दीने मोदींचा तापलेला माथा पाहून भाजपच्या पायाखालची वाळू सरकली !

मुंबई | “वर्ध्याच्या सभेतील कमी गर्दीने मोदींचा तापलेला माथा पाहून भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे, हे नक्की. २०१४ साली दिलेल्या आश्वासनांचा कित्ता गिरवून सत्तेची आस लावून घेण्यात अर्थ नाही हे त्यांनी जाणावे. बेरोजगारी, महागाई, शेतकरी आत्महत्या यांचा चढता आलेख पाहता कुंभकर्ण कोण ते स्पष्टच आहे”, असे म्हणत विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी पंतप्रधान मोदीच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी कुंभकर्णासारखी, अशा शब्दात पंतप्रधान मोदींनी आघाडीवर टीका केली होती. या टीकेला धनंजय मुंडे यांनी ट्विट करून उत्तर दिले आहे.

आगामी निवडणुकांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज (१ एप्रिल) महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदींच्या उपस्थित महाराष्ट्रातील वर्ध्यात पहिली जाहीर सभा पार पडली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. “शरद पवार यांनी देशातील वारे कुठे वाहत आहेत हे ओळखले आहे. त्यामुळे पवारांनी निवडणूक लढण्याआधीच मैदान सोडले आहे”, असे म्हणत मोदींनी पवारांवर टीका केली होती.

धनंजय मुंडे यांनी आणखी एक ट्विट करत पंतप्रधान मोदींना टोला लगावला आहे. “शरद पवार यांच्या कुटुंबाची आणि राष्ट्रवादीची काळजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करू नये. गडकरी यांनी पंतप्रधानांबद्दल काही दिवसांपूर्वी काय वक्तव्य केले हे सर्वज्ञात आहे. आपल्याच पक्षातील ज्येष्ठ नेत्यांची पंतप्रधानांनी काय स्थिती करून ठेवली आहे याकडे प्रथम लक्ष द्यावे”, असा खोचक टोला धनंजय मुंडे यांनी यावेळी पंतप्रधान मोदींना लगावला आहे.

Related posts

राहुल गांधी आज वायनाड दौऱ्यावर

News Desk

ना दलित, ना मुसलमान ‘जाट’ आहेत हनुमान !

News Desk

कॉंग्रेसने कधीही भगवा दहशतवाद असे म्हटले नाही | पीएल पुनिया

News Desk