HW News Marathi
देश / विदेश राजकारण

बागेश्वर बाबांनी संत तुकाराम महाराजांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीवरून राज्यभरात नाराजी

मुंबई | “संत तुकाराम महाराज महाराष्ट्राचे एक असे माहात्मा की, त्यांची पत्नी त्यांना रोज मारत होती. त्यांची पत्नी त्यांना रोज काठीने मारत होती”, अशी आक्षेपार्ह टिप्पणी बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज (Bageshwar Dham Dhirendra Krishna Shastri )यांनी केले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी बागेश्वर महाराज यांना अंधश्रद्धा निर्मूलन समितीने  चमत्कार सिद्ध करून दाखविण्याचे आव्हान दिले होते. परंतु, अंधश्रद्धा निर्मूलन समिती दिलेल्या आव्हानानंतर बागेश्वर महाराज यांनी प्रवचनात कथित चमत्कार दाखवून मला पुन्हा आव्हान देऊ नका, असे सुनावले होते. यानंतर आता बागेश्वर महाराज यांनी संत तुकाराम महाराज (Sant Tukaram Maharaj) यांच्याविषयी आक्षेपार्ह टिप्पणी केल्यामुळे राज्यातील राजकीय नेत्यांसह भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले नाराजी व्यक्त करत त्यांनी माफी मागणी केली.

 

बागेश्वर  महाराज संत तुकाराम महाराजांबद्दल बोलताना म्हणाले, “संत तुकाराम महाराज महाराष्ट्राचे एक असे माहात्मा की, त्यांची पत्नी त्यांना रोज मारत होती. त्यांची पत्नी त्यांना रोज काठीने मारत होती. त्यांना कोणी विचारले की, तुम्ही रोज पत्नीचा मार खाता, तुम्हाला लाज नाही वाटत. तेव्हा संत तुकाराम म्हणाले की,  देवाची कृपा आहे की मला मारणारी पत्नी मिळाली आहे. यात तुमच्यावर कोणती कृपा झाली, असा प्रश्न संत तुकाराम महाराजांना विचारल्यावर ते म्हणाले, “जर माझ्यावर प्रेम करणारी पत्नी भेटली असती तर मी देवावर प्रेम करण्याची संधी नसती मिळाली. मी पत्नीच्याच प्रेमात गुरफटून गेलो असतो. मला मारणारी पत्नी मिळाल्यामुळे ती मला संधी तरी देते की, तू माझ्या फेऱ्यात कुठे अडकलाय, जा भगवान रामच्या चरणी जा”

 

पंडित धीरेंद्र शास्त्रींनी माफी मागवी

बागेश्वर महाराज यांनी संत तुकाराम महाराजांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणी भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले नाराजी व्यक्त करत माफी मागण्याची मागणी केली आहे. तुषार भोसले म्हणाले, “बागेश्वर धाम तथा पंडित धीरेंद्र शास्त्री यांनी जगत गुरू संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल बोलताना एक चुकीचा संदर्भ दिलेला आहे. आणि ज्यातून संत तुकाराम महाराज आणि त्यांची धर्मपत्नी यांच्या प्रतिमेला ठेच पोहोचली आहे. यातून केवळ वारकरी संप्रदायाचे नाही तर महाराष्ट्राचा आपमान केला आहे. आणि म्हणून आम्ही मागणी करतो, त्यांनी लवकरात लवकर जगत गुरु संत तुकाराम महाराज यांची माफी मागवी.”

 

सुप्रिया सुळेंकडून जाहीर निषेध

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, “जाहीर निषेध झाला पाहिजे, जे लोक असे बोलतात. अर्थात चुकीचे आहे. आणि मी ही अध्यात्माकडे वळलेले आहे. मी आध्यात्म करते. घरात वाईट आहे म्हणून नाही. ते चांगले भारतीय संस्कार आहेत. आणि ते प्रत्येकाच्या व्यक्तीवर, मुलांवर आपण करण्याचा प्रयत्न हा प्रत्येक कुटुंब करत असतो. संत तुकाराम महाराजांचा अपमान होत असेल, तर त्याचा जाहीर निषेध म्हणून समाज म्हणून आपण केला पाहिजे.”

 

 

Related posts

चंद्रशेखर आझाद यांची सुटका करा | अविनाश महातेकर

News Desk

मुंबईकरांचा मनस्ताप अब की बार लांबूनचं नमस्कार……

News Desk

काँग्रेसचे सर्जिकल स्ट्राइक ना दहशतवादी, ना जवान, ना देशातील जनता कुणाला कळाले नाही!

News Desk