HW Marathi
राजकारण विधानसभा निवडणूक २०१९

‘सिल्वर ओक’वर शरद पवार-प्रफुल्ल पटेलांमध्ये चर्चा सुरु

मुंबई | विधानसभेच्या निकालानंतर निर्माण राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा आता सुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर, राज्यातील राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. एकीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी मालाड येथील ‘रिट्रीट हॉटेल’वर जाऊन आपल्या आमदारांची भेट घेतली, चर्चा केली. तर राज्यपालांनी पाठविलेल्या सत्तास्थापनेच्या निमंत्रणावर सध्या ‘वर्षा’वर भाजपच्या कोअर कमिटीची आजच्या दिवसातली दुसरी बैठक सुरु असून थोड्याच वेळात भाजप आपली याबाबत भूमिका स्पष्ट करणार आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘सिल्वर ओक’ या निवासस्थानी दाखल झाले असून या दोन्ही नेत्यांमध्ये सध्या चर्चा सुरु असल्याची माहिती मिळत आहे.

विधानसभा निवडणुकीच्या निकालांपासून राज्यातील सत्तास्थापनेवरून भाजप-शिवसेनेत मोठा संघर्ष सुरु आहे. मुख्यमंत्रीपद आणि जागावाटपाच्या फॉर्म्युल्यावरून हे दोन्ही पक्ष मागे हटण्याचे नाव घेत नाही आहेत.नुकतेच देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेतून एकमेकांवर सडकून टीका देखील केली होती. तर दुसरीकडे शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसच्या नव्या समीकरणांची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. राज्याच्या या संपूर्ण सत्ता संघर्षात सध्या काँग्रेस-राष्ट्रवादी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांची ही बैठक महत्त्वाची ठरते.

Related posts

भाजप पूर्णपणे मोदी-शहांच्या कब्जात आहे | निरुपम

News Desk

एक्झिट पोलच्या माध्यमातून हजारो ईव्हीएम्समध्ये फेरफार करण्याचा प्रयत्न !

News Desk

सरकार जितेंद्र आव्हाड यांना मारण्याचा कट रचत आहे का ?

News Desk