HW News Marathi
राजकारण

‘मोदी मुर्दाबाद’च्या घोषणा द्यायच्या नाहीत !

नवी दिल्ली । आगामी निवडणुकांच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडूनही आपल्या कार्यकर्त्यांना काही सूचना देण्यात आल्या आहेत. ‘मोदी मुर्दाबाद’ अशा घोषणा देऊ नका. आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला प्रेम व स्नेहभाव राखून भाजपवर विजय मिळवायचा आहे”, असे ते म्हणाले.

राहुल गांधीच्या ओडिसामधील सभेत ‘मोदी मुर्दाबाद’ अशा घोषणा देणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना राहुल गांधींनी थांबविले. मुर्दाबाद या शब्दाचा वापर भाजप संघाचे कार्यकर्ते करतात. काँग्रेसमध्ये असे शब्द वापरले जात नाहीत. आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला प्रेम व स्नेहभाव राखून भाजपवर विजय मिळवायचा आहे. संघ निवडणूक आयोगापासून न्यायव्यवस्थेपर्यंत प्रत्येक यंत्रणेवर आपले नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप देखील राहुल गांधी यांनी यावेळी केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर, राज्यात आजपासून आचारसंहिता लागू

News Desk

पर्रीकर यांच्या निधनानंतर गोव्याच्या मुख्यमंत्रीपदासाठी राजकीय पक्षांची चढाओढ

News Desk

उद्धव ठाकरेंची भाजपला पहिल्यांदाच खुली ऑफर!

News Desk