HW Marathi
राजकारण

लोकांची मने नुसती ओळखू नका; तर ती जिंकायलासुद्धा हवीत | बाळा नांदगावकर

कर्जत | तरुणांमधील क्रीडा क्षेत्रातील कला गुणांना वाव मिळावा, यासाठी कर्जत येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना कबड्डी स्पर्धांचे आयोजन जितेंद्र पाटील आणि प्रवीण दत्तात्रेय बोराडे यांनी कर्जतजवळील हालीवली येथे 10 व 11 फेब्रुवारी दरम्यान जिल्हा व तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला मनसे नेते बाळा नांदगावकर उपस्थित होते तेव्हा ते बोलत होते.

या वेळी बोलताना बाळा नांदगावकरांनी कबड्डी स्पर्धेचे आयोजन उत्कृष्ट असल्याचे सांगितले. तसेच कबड्डी हा मराठी मातीतला रांगडा खेळ असून तो मॅटवर खेळला जातोय, याची खंत व्यक्त केली.

या वेळी मनसे रायगड जिल्हा व विविध शाखांच्या वतीने नांदगावकर यांचा सत्कार करण्यात आला.

या वेळी त्यांच्यासोबत भाजपमध्ये गेलेले माजी आमदार देवेंद्र साटम, रेल कामगार सेनेचे सुनील हर्षे, जिल्हा सचिव प्रवीण गांगल, महेश जाधव, जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील, उपजिल्हाध्यक्ष जे. पी. पाटील, उप-तालुकाध्यक्ष प्रवीण बोराडे, विलास डुकरे, कर्जत तालुका सहसचिव प्रदीप पाटील, खोपोली शहराध्यक्ष अनिल मिंडे, नेरळ शहर अध्यक्ष मिलिंद मिसाळ, कर्जत शहराध्यक्ष योगेश पोथरकर यांच्यासह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते, खेळाडू व कबड्डी रसिक उपस्थित होते.

Related posts

#ElectionsResultsWithHW : साताऱ्यात उदयनराजेंची ९ हजारांपेक्षा अधिक मतांनी आघाडी

News Desk

नितेश राणेंनी उपअभियंत्यांच्या अंगावर ओतला चिखल

News Desk

भाजप-शिवसेनामधील संघर्ष सोडविण्यासाठी अमित शाह मुंबई दौऱ्यावर

News Desk