बंगळुरू | यंदाच्या लोकसभा निवडणुकीदरम्यान अनेक दिग्गज नेतेमंडळींनी वादग्रस्त विधानाने चर्चा झाल्या आहेत. आता अजून एका दिग्गज नेत्यांची भर पडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, काँग्रेसला ४० जागा देखील मिळणार नाहीत. जर काँग्रेसला ४० पेक्षा अधिक जागा मिळाल्या तर मोदी दिल्लीतील विजय चौकामध्ये स्वत:ला फाशी लावून घेणार आहेत का?, असे वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी केले आहे. खर्गे यांच्या विधानाने सर्व स्तरातून टीका होत आहे.
Mallikarjun Kharge, Congress in Kalaburagi: Wherever he goes, Modi keeps saying that Congress will not win 40 seats. Do you believe that? If Congress gets more than 40 seats, will Modi hang himself at Delhi's Vijay Chowk? pic.twitter.com/ti3uPIYqlV
— ANI (@ANI) May 12, 2019
खर्गे कर्नाटकातील कलबुर्गी येथे एका प्रचारसभेला संबोधित करताना ते म्हणाले की, येथे उपस्थित असलेले लोक देशाचे भविष्य लिहिणार आहेत. सुभाष आणि भविष्य तुमच्या हातात असून मोदी जिथे जिथे प्रचार सभा घेत आहेत. त्या प्रचार सभेत सांगतात की, “काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत ४० जागा सुद्धा मिळणार नाहीत. मोदींच्या या विधानावर तुमच्यापैकी कुणाचा यावर विश्वास बसतो का?, जर काँग्रेला ४० पेक्षा जास्त जागा मिळाल्या तर मोदी दिल्ली मधील विजय चौकात स्वत: ला फाशी लावून घेणार आहेत का ?”खर्गे यांच्या याविधानावर भाजपचे वरिष्ठ नेता आणि खासदार शोभा करंदलाजे यांनी म्हटले की, एवढ्या ज्येष्ठ नेत्याकडून अशा अशोभनीय विधानाची अपेक्षा नव्हती, अश शब्दात टीका केली असून खर्गेंनी त्यांच्या विधानाबद्दल माफी मागवी अशी मागणी केली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.