HW News Marathi
राजकारण

“…मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्र्यांनी राजीनामा द्यावा”, संजय राऊतांची मागणी

मुंबई | “भाजपने महाराजांचा अपमाना केला आहे. या अपमानानंतर मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्र्यांनी ताबडतोप राजीनामा द्याला हवा होता”, अशी मागणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजा (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटाकडे केली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे नेहमी वादग्रस्त वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात राहतात. राज्यपालानी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. शिवाजी महाराजांनी औरंगजेबाकडे पाच वेळा माफी मागितली, असे वक्तव्य राज्यपालांनी औरंगबादाच्या कार्यक्रमात केले आहे. राज्यपालांच्या वक्तव्यामुळे राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. नुकतेच काँग्रेस खासदार राहुल गांधींनी वीर सावकर यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे राज्यात राजकीय घमासान सुरू होते. हे प्रकरण ताजे असतानाच राज्यपालांनी महाराजांसंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले. या पार्श्वभूमीवर राऊतांनी आज (20 नोव्हेंबर) पत्रकार परिषदेत माध्यमांशी बोलताना राज्यपालांच्या मुद्यांवर भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटावर हल्ला बोल केला आहे.

 

संजय राऊत म्हणाले, “शिवाजी महाराजांच्या अपमानानंतर तुम्ही सरकारमधून राजीनामा द्याला हवा होता. कारण, भाजपने महाराजांचा अपमाना केला आहे. या अपमानानंतर मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्र्यांनी ताबडतोप राजीनामा द्याला हवा होता. आम्ही महाविकास आघाडीमध्ये गेलो. म्हणून महाराष्ट्राचा स्वाभिमान दुखावला, म्हणून तुम्ही पक्ष सोडला. येथे तर भाजपने त्यांच्या राज्यपालांनी अधिकृतपणे शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे. शिवाजी महाराजांना माफीवीर म्हटले. तरी तुम्ही सत्तेला चिटकून बसलेला आहात. महाराष्ट्र तुमच्या सरकार थुंकतोय. यांनी पुन्हा एकदा अत्यंत दळभद्री विधान केलेले आहे. राज्यपालांनी शिवाजी महाराजांवर केलेल्या विधानामुळे पुन्हा एकाद महाराष्ट्राचा स्वाभिमान दुखावला आहे. त्याच वेळेला भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी त्यांनी राष्ट्रीय सत्तरावर शिवाजी महाराजांनी सुद्धा पाच वेळा औरंगजेबाची माफी, असे विधान केले. यांच्या नजरेतून का सुटते हे मला कळत नाही”, असा सवाल त्यांनी भाजपला केला.

 

राऊत पुढे म्हणाले, “ही भाजपची अधिकृत भूमिका आहे का?, वारंवार छत्रपती शिवाजी महाराज, ज्योतीबा फुले, सावित्री बाई फुले, यांचा अपमान करायचा, संभाजी राजेंचा अपमान करायचा, छत्रपती शिवाजी महाराजांनी पाच वेळा कधी माफी मागितली. हे आज महाराष्ट्रच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले पाहिजे. कारण ते भाजपचे  आता सहयोगी आहेत. ते मुख्यमंत्री आहेत. वीर सावकरांसंदर्भात तुम्ही रस्त्यावर उतरलात स्वागत आहे. जोडे मारले स्वागत आहेत. हे जोडे आता तुम्ही कोणाला मारणार आहात. भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांना की राज्यपालांना मारणार आहात?,” असे सवाल करत भाजपवर निशाणा साधला आहे.

 

 

Related posts

“भाजपचा ताणतणाव कमी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केलंय ‘ते’ वक्तव्य”-नाना पटोले

News Desk

“भारत जोडो यात्रेत ‘मविआ’च्या काळात केलेल्या भ्रष्टाचाराच्या पैशांचा वापर”, चंद्रशेखर बावनकुळेंचा आरोप

Aprna

पुतण्या आला धावून

Gauri Tilekar