HW News Marathi
राजकारण

आंबेडकर, शिंदेसह शिवाचार्य उमेदवारांची संपत्ती तुम्हाला माहिती आहे का ?

मुंबई | सोलापूर लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे. बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि भाजपचे डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य या तिघांनी काल (२५ मार्च) उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यात तिघांनी अर्ज दाखल करताना सादर करण्यात आलेल्या त्यांच्या प्रतिज्ञापत्रात नमुद केलेली संपत्तीचा माहिती दिली आहे.

या प्रतिज्ञापत्रात प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या पत्नी अंजली आंबेडकर यांची संपत्ती मिळून 3 कोटींपेक्षा जास्त आहे. २०१४-१५ च्या तुलनेत २०१८-१९ मध्ये त्यांच्या उत्पन्नात जवळपास ७ लाखांची वाढ झाली आहे. तर सुशीलकुमार शिंदेंवर ३७ लाखांचे तर त्यांच्या पत्नीवर १० लाखांचे कर्ज आहे. २०१४-१५ च्या तुलनेत त्यांचे उत्पन्न सुमारे २२ लाखांनी वाढले आहे. याशिवाय भाजपचे उमेदवार डॉ जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांची जंगम मालमत्ता ६ लाखांची तर स्थावर मालमत्ता २ कोटींची संपत्ती दाखविली आहे.

 

 

Related posts

आगामी निवडणुकीत स्त्री हट्ट फडणवीसांना भोवणार का ?

News Desk

गजानन किर्तीकर यांच्या प्रवेशाने पक्षाला बळ मिळालं! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Manasi Devkar

अजित पवार अन् शरद पवार आज बारामतीत, कुटुंबातील वाद मिटवण्यासाठी होणार चर्चा?

swarit