मुंबई | “आम्हाला तोंड उघडायला लावू नका नाही तर महाराष्ट्रात स्फोट होतील”, असा इशारा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्य सरकारला दिला. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची पत्नी अमृता फडणवीस यांना लाच दिल्याप्रकरणी बुकी जयसिंघांनी यांची मुलगी डिझानयर यांनी पोलिसांनी उल्हसनगर पोलिसांनी अटक केली आहे. यानंतर जयसिंघांनी आणि उद्धव ठाकरे यांचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ‘आमच्यावर बाळासाहेब ठाकरेंनी संस्कार केले आहे’, असा टोला संजय राऊतांनी पत्रकारांच्या प्रश्न उत्तर देताना लगावला आहे. त्याचबरोबर संजय राऊतांनी आज (18 मार्च) शेतकरी लाँग मार्च, अवकाळी पाऊस, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आदी मुद्यांवरून शिंदे सरकारवर निशाणा साधला.
“आज सुद्धा तुरुंगामध्ये एकनाथ खडसे यांचे जावाई आहेत. याचे उत्तर गिरीश महाजन आणि फडणवीसांनी. आम्ही तुरुंगात गेलो, अनिल देशमुख तुरुंगात गेले, नवाब मलिक तुरुंगात आहेत. काय कारणे काय आहे?, असा सवाल राऊतांनी केला. यापुढे राऊत म्हणाले, आमच्यावर आरोप होतात, ते खरे असतात. आणि तुमच्यावर जे आरोप सुरू आहेत आता सगळे, कालपर्यंतचे आरोप ते खोटे का? ते खोटे आणि आमच्यावरील आरोप खरे तुम्ही सुद्धा तुरुंगात जाल अशा प्रकारचे खटले चालले पाहिजेत. तुमचे कुटुंब तुरुंगात जातील अशा प्रकराचे पुरावे आहेत. तरी पतर संगतो की, तुमच्या कुटुंबापर्यंत आम्ही पोहोचणार नाही. पण आम्हाला तोंड उघडायला लावू नका नाही तर महाराष्ट्रात स्फोट होतील”, अशा इशारा संजय राऊतांनी शिंदे गटाला दिला आहे.
कटुता महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस तर केंद्रात नरेंद्र मोदी आणि अमित शहा आणली
बुकी जयसिंघांनीसोबत उद्धव ठाकरेंचे फोटो व्हायरल होत आहे, या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले, “आता फोटोचे राजकारण काढले. तर मग राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री त्यांचे कुटुंबिय यांचे कोणाकोणा बरोबर फोटो आहेत. हे सुद्धा बाहेर येत आहेत. त्यावर न बोललेले बरे. अमृता फडणवीस यांचे पण नाव गोविले जात आहे. मला माहिती नाही पोलीस तपास करत आहेत. मी कालही म्हणालो, आमच्यावर संस्कार आहेत. ते संस्कार बाळासाहेब ठाकरेंनी केले आहेत. शरद पवार असतील, कोणाच्याही कुटुंबपर्यंत राजकारण घेऊन पोहचायचे नाही. कुटुंबाला त्रास होईल, कुटुंबाची बदनामी होईल, कुटुंब तुरुंगात जाईल, या पद्धतीचे घाण्याडे आणि दळभदरी राजकारण आम्ही कधीच केले नाही. ना बाळासाहेब ठाकरेंनी गेले, ना बाळासाहेब ठाकरेंनी केले, ना महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केले. पण, ही कटुता महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी आणली. आणि केंद्रात नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी आणली.”
शिवसेना तोंडण्याची…
सामना आजच्या आग्रलेखातून महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावर संजय राऊत म्हणाले, “यावर मुख्यमंत्र्यांनी बोलावे, तुम्ही स्व:ता घोषणा केलीय की महाराष्ट्राच्या योजना आम्ही सीमा भागात राबवू म्हणून आणि ते मुख्यमंत्री तुम्हाला सांगत आहेत की, राबवून दाखवा. तुमच्या हिम्मत होती ना, शिवसेना तोंडण्याची तुमच्यात हिम्मत होतीना भाजपबरोबर जाण्याची तुमच्यामागे महाताकद आहे ना. मग ती महाशक्ती दाखवा. बोम्मईना हिम्मत असेल तर खरोखर तुमच्या मनगटात रक्त असेल तर बाळासाहेबांच्या शिवसेनेचे तिकडे हिम्मत दाखवा. आमच्या अंगावर फुसकारे सोडू नका.”
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.