HW News Marathi
राजकारण

डॉ. पायल तडवी यांचे आई-वडील घेणार मुंबई उच्च न्यायालयात धाव

मुंबई | राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, डॉ. तडवी यांचे नातेवाईक आणि नायर हॉस्पिटलच्या अधिष्ठतांची झालेली बैठक पूर्णपणे निष्फळ ठरल्याने आता या पार्श्वभूमीवर डॉ. तडवी यांचे नातेवाईक मुंबई उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याची माहिती मिळत आहे. जातीयवादावरून होणाऱ्या रॅगिंगला कंटाळून वैद्यकिय पदव्युत्तर शिक्षणाकरिता मुंबईच्या नायर हॉस्पिटलमध्ये शिक्षण घेत असलेल्या आदिवासी समाजातील डॉ. पायल तडवी यांनी बुधवारी (२२ मे) आत्महत्या केली होती.

डॉ. पायल तडवी आत्महत्येप्रकरणी अद्याप प्रशासन कोणतीही प्रतिक्रिया द्यायला तयार नाही. याविरुद्ध आज (२८ मे) डॉ. तडवी यांच्या कुटुंबियांकडून नायर हॉस्पिटलसमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी गिरीश महाजन यांनी आंदोलनस्थळी पोहोचत डॉ. पायल तडवी यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्याचप्रमाणे “डॉ. पायल तडवी आत्महत्येप्रकरणी दोषी असणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल”, असे आश्वासन देखील गिरीश महाजन यांनी दिले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

निवडणूक लढवू नये म्हणून डायनामाइटचा स्फोट घडवून नक्षलवाद्यांनी उध्वस्त केले नेत्याचे घर

News Desk

ओबीसी शिष्यवृत्ती बाबतचा मार्चमधील निर्णय ऑगस्टमध्ये रद्द करणे अन्यायकारक – छगन भुजबळ

Manasi Devkar

‘युती झाली नाही तरीही लोकसभेला भाजपसोबत’

News Desk