HW News Marathi
राजकारण

अहमदनगरच्या जागेसाठी सुजय विखे पाटील राष्ट्रवादीत प्रवेश करणार ?

पुणे | लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे. तसतशी जागा वाटपावरून राजकीय पक्षात तेढ निर्माण होत असल्याचे दिसत आहे. यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या अहमदनगरच्या जागेवरून तिढा निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय विखे पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश आज (५ मार्च) किंवा बुधवारी (६ मार्च) राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीत ४८ जागांपैकी सर्वच जागांवर निवडणुका लढणार आहे. सुजय हे अहमदनगर मतदारसंघतातून निवडणूक लढविण्यासाठी अनेक महिन्यांपासून प्रयत्न करत आहेत. मात्र विखे पाटील आणि पवार यांच्या कुटुंबातील वादामुळे या जागेवर अद्याप निर्णय झालेला नाही.

तसेच काही दिवसांपूर्वी ही जागा राष्ट्रवादीने काँग्रेससाठी सोडल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. आता मात्र या जागेवर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार लढणार असल्याचे म्हटले जाते. दोन्ही पक्षाकडून उमेदवारांची यादी जाहीर होत नाही तोपर्यंत अहमदनगर या जागेवरून अनेक चर्चा रंगणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बावनकुळे आमचा हिरा, मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

News Desk

निजामाची चाटुगिरी थांबवली नाही,तर तुमचाही ‘औरंग्या’ झाल्याशिवाय राहणार नाही !

News Desk

उद्धव ठाकरे, संजय राऊतांसह राजेंद्र भागवत यांना पुसद न्यायालयाने जारी केले वॉरंट

News Desk