HW News Marathi
राजकारण

द्रौपदी मुर्मू पहिल्या आदिवासी आणि दुसऱ्या महिला राष्ट्रपती पदी विराजमान

मुंबई | द्रौपदी मुर्मू या देशाच्या नव्या राष्ट्रपती बनल्या आहेत. मुर्मू या आदिवासी समाजातील पहिल्या आणि देशातील दुसऱ्या महिला राष्ट्रपती आहेत. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांचा विजय झाला आहे. मुर्मू देशाच्या १५ व्या राष्ट्रपती पती झाल्या असूस यूपीएचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचा पराभव झाला आहे.

मुर्मू यांना तिसऱ्या फेरीच्या मतमोजणीत ५,७७,८८८ एवढ्या मुल्याची मते मिळाली तर सिन्हा यांना २,६१,०६२  एवढ्या मुल्याच्या मताने त्यांचा पराभव झाला आहे. मुर्मू यांनी बहुमताचा आकडा परा केला आहे. यामुळे मुर्मू यांच्या विजयावर झाला असून अजूनही मतमोजणी सुरू आहे. आतापर्यंत फक्त १४ राज्याचे मतमोजणी मुर्मू यांचा विजय झाला आहे.

दरम्यान, 18 जुलैला भारताच्या १५ व्या राष्ट्रपती पदासाठी निवडणुक पार पडली. निकालानंतर नवे राष्ट्रपती २५ जुलैला शपथ घेतील. पण मुर्मू जर विजयी झाल्या, तर देशातील या सर्वोच्च घटनात्मक पदावर पहिल्यांदा आदिवासी महिला विराजमान होतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. पण तरी देशाचा 15 राष्ट्रपती कोण होणार हे थोड्या वेळाने स्पष्ट होणार आहे. आजच्या या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी लोकसभेतील ५४३ आणि राज्यसभेतील २३३ या दोन्ही सभागृहातील एकूण ४८०९ खासदार मतदान केले आहे. यासाठी संसद भवनात ६ बूथ मतदानासाठी उभारण्यात आले होते. संसदेच्या दोन्ही सभागृहातील खासदारांचे मूल्य १० लाख, ८६ हजार, ४३१ एवढे आहे. दोन्ही सभागृहातील खासदारांचे प्रत्येक मताचे मूल्य ७०० एवढे होते. त्यामुळे खासदारांच्या एकूण मताचे मूल्य ५ लाख ४३ हजार २०० एवढे आहे. दरम्यान, एनडीएच्या उमदेवार द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती पदासाठीच्या निवडणुकीत 61 टक्क्यांपेक्षा जास्त लोकप्रतिनिधींचा पाठिंबा आहे.
संबंधित बातम्या

 

आज द्रौपदी मुर्मूंच्या राष्ट्रपतीपदाच्या विजयावर होणार शिक्कामोर्तब; देशाला मिळणार दुसरी महिला राष्ट्रपती

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#LokSabhaElections2019 : रमजान महिन्यात येणाऱ्या तारखांना मुस्लिम धर्मगुरूचा आक्षेप, आयोगाचे स्पष्टीकरण

News Desk

पुण्यात होणारी पोटनिवडणूक बिनविरोधी व्हावी; राज ठाकरेंचं फेसबुक पोस्टद्वारे आवाहन

Aprna

गुजरातमध्ये शिक्षणाचा व्यापार | हार्दिक पटेल

News Desk