HW News Marathi
महाराष्ट्र राजकारण

“…तब्बल दिडशे बैठका घेतल्या”, मंत्री तानाजी सावंत यांचा गौप्यस्फोट

मुंबई | “बंडासाठी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि मी तब्बल दिडशे बैठका केल्या आहेत”, असा गौप्यस्फोट राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत (Dr. Tanaji Sawant) यांनी केला आहे. तानाजी सावंत हे नेहमीच वक्तव्याने चर्चेत राहिले आहे. परुंतु,  तानाजी सावंत यांनी बंडासंदर्भात केल्या गौप्यस्फोटामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली. तानाजी सावंत यांना हा गौप्यस्फोट परंडा शहरातील कुस्ती स्पर्धेच्या कार्यक्रमात बोलताना केले होते.

तानाजी सावंत म्हणाले, “हे 2019 पर्यंत सांगितले, 2019नंतरचे मी सांगतो, त्यावेळेस सत्ता बदलाचे काम चाललेले होते. आमदारांचे कौन्सलिंगचे काम चालेले होते. देवेंद्र फडणवीस आणि माझ्या बैठका होत होत्या. आमचे आताचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि माझे त्या दोन वर्षात जवळपास शंभर ते दीडशे बैठका झाल्या होत्या. देवेंद्र फडणवीसच्या  (Devendra Fadnavis)आदेशाने तमाम महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा बंडखोरी करून धाराशीवची जिल्हा परिषद शिवसेना-भाजप आणली. ती सुरुवात या ठिकाणाहून केली आहे. ही वस्तुस्थिती आहे. आणि त्या वेळेसच बंडाचे निशाण फडकावले होता.”

“मी पुन्हा मातोश्रीची पायरी चढणार नाही, असे मातोश्रीवर जाऊन सांगून आलो होतो”, असे तानाजी सावंत म्हणाले. त्याचबरोबर महाविकास आघाडीचे सरकार उलथून टाकल्याशिवाय मी गप्प बसणार नव्हतो आणि त्यांची प्रतिची देखील आल्याचे तनाजी सावंतांनी म्हटले.

 

Related posts

काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेला आजपासून सुरुवात

swarit

दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने आणि वेळेनुसारच होणार

News Desk

एसटीची वाहतूक पूर्वपदावर आणण्यासाठी महामंडळ प्रयत्नशील

News Desk