HW News Marathi
राजकारण

लोकसभेचा प्रचार संपला, ‘नमो टीव्ही’ देखील बंद

नवी दिल्ली | लोकसभा निवडणुकांच्या सातव्या आणि अंतिम टप्प्यासाठीचा प्रचार संपल्यानंतर म्हणजेच शुक्रवारपासून (१७ मे) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभा आणि संदेशांचा प्रचार, प्रसार करणारे ‘नमो टीव्ही’ चॅनेल बंद झाले आहे. यंदाच्या लोकसभेसाठी भाजपचे प्रचाराचे माध्यम म्हणून ‘नमो टीव्ही’ सुरु करण्यात आले होते. त्यामुळे, या निवडणुकांच्या अंतिम टप्प्याचा प्रचार संपताच हे चॅनेल देखील बंद करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

निवडणुकांसाठीची प्रचाराची वेळ निघून गेल्यानंतरही ‘नमो टीव्ही’वर प्रसारित होणाऱ्या निवडणूक संदर्भातील बातम्यांमुळे मोठा वाद निर्माण झाला होता. या प्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगाने भाजपला नोटीस देखील पाठवली होती. निवडणूक आयोगाच्या परवानगीशिवाय ‘नमो टीव्ही’वर कोणतेही कार्यक्रम प्रसारित केले जाऊ शकत नाहीत, असे स्पष्ट आदेश निवडणूक आयोगाने एप्रिल महिन्यात दिले होते. काँग्रेस आणि देशातील अन्य विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाकडे “निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी ‘नमो टीव्ही’वर बंदी घालण्यात यावी असे आदेश माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला देण्यात यावेत”, अशी मागणी केली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चहाचा रिकामा कप देणाऱ्याच्या हातात देशाची सत्ता, मागासवर्गीय असणे अभिशाप

News Desk

पुण्यात राष्ट्रवादीचे अनोखे आंदोलन; बनावटी राज्यपालांचे फेडले धोतर

Aprna

शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ चिन्ह कुणाचे यावर निवडणूक आयोगात होणार फैसला

Aprna