HW News Marathi
राजकारण

आज संध्याकाळी एनडीएच्या नेत्यांची बैठक अन् डीनर पार्टी

नवी दिल्ली | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आज (२१ मे) म्हणजेच लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होण्याच्या अवघ्या दोन दिवसांपूर्वी एनडीएच्या नेत्यांची बैठक बोलवली आहे. संध्याकाळी ७ वाजता अशोका हॉटेलमध्ये ही बैठक सुरु होईल. या बैठकीत एकूण २९ नेते आपली उपस्थिती दर्शविणार आहेत. या बैठकीनंतर या नेत्यांची डीनर पार्टी होणार आहे. दरम्यान, या बैठकीपूर्वी संध्यकाळी ४ वाजता भाजप मुख्यालयात मंत्री परिषदेच्या सदस्यांसह पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांची बैठक होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि लोक जनशक्ती पक्षाचे नेते रामविलास पासवान यांसह अन्य अनेक नेते यावेळी उपस्थित असतील. देशातील लोकसभा निवडणुकांचा सातवा आणि अंतिम टप्पा रविवारी (१९ मे) पार पडला. त्यानंतर आता सर्वच राजकीय पक्षांना निवडणुकांच्या निकालांचे वेध लागले आहे. देशातील विविध वृत्तसंस्थांनी दिलेल्या एक्झिट पोलनुसार, यंदाही केंद्रात मोदी सरकारच असेल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

२३ रोजी निकालानंतर नेमकी स्थिती समोर येईल. लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतरची रणनीती आखण्यात सध्या सर्वच राजकीय पक्ष व्यस्त आहेत. एकीकडे देशातील विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या एका पाठोपाठ एक चर्चा आणि बैठकी सुरु आहेत. तर दुसरीकडे याच पार्श्वभूमीवर आज संध्यकाळी एनडीए नेत्यांची बैठक देखील होणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अजित पवार आणि पार्थ पवारांसंबंधी बारामतीतून आली मोठी बातमी

swarit

सरकारमधील मंत्र्यांची दालने म्हणजे भ्रष्टाचाराचे अड्डे | धनंजय मुंडे

News Desk

“…इतके दुटप्पी माणसाने वागू नये”, अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला

Aprna