HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

योगी आदित्यनाथसह मायावती यांच्यावर प्रचारबंदी, निवडणूक आयोगाचा दणका

नवी दिल्ली | लोकसभा निवडणुकीच्या प्रचारदरम्यान सतत वादग्रस्त वक्तव्य करणारे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख व माजी मुख्यमंत्री मायावती या दोघांनाही निवडणूक आयोगाने कठोर पावले उचलेली आहे. निवडणूक आयोगाने योगी आदित्यनाथ यांच्यावर ७२ तास अर्थात तीन दिवस आणि मायावती यांच्यावर ४८ तास अर्थात दोन दिवसांसाठी प्रचारबंदी करण्यात आली आहे. ही प्रचारबंदी उद्या (१६ एप्रिल) सकाळी ६ वाजल्यापासून लागू होणार आहे.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान योगी आदित्यनाथ आणि मायावती या दोन्ही दिग्गज नेत्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे आचारसंहितेचे उल्लंघन केल्यामुळे निवडणूक आयोगाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने केलेल्या कारवाईनुसार प्रचार, रोड शो किंवा मुलाखत अशा लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराशी निगडीत कोणत्याही कार्यक्रमात हे दोन्ही नेते सहभाग घेऊ शकणार नाहीत.

मायावती आणि योगी आदित्यनाथ यांचे वादग्रस्त वक्तव्य

देवबंद येथे सपा-बसपा आणि रालोदच्या पहिल्याच संयुक्त प्रचारसभेत ‘मी खास मुसलमान सभेदरम्यान मुस्लिम समुदायाला सपा-बसपा महाआघाडीलाच मतदान करण्याचे आवाहन केले होते. धर्माच्या नावावर मतदान मागण्याच्या नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी मायवतींवर कारवाई करण्यात आली आहे. तर योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांना ‘अली’ आवडतो तर आम्हाला ‘बजरंग’ बली आवडतो, असे विधान केले. या दोन्ही नेत्यांनी धर्माच्या नावावर मतदान करण्याचे आवाहन केल्यामुळे दोन्ही नेत्यांवर  निवडणूक आयोगाकडून कारवाई करण्यात आली आहे.

 

 

 

Related posts

#LokSabhaElections2019 : भाजपच्या माढा मतदारसंघाचा तिढा सुटता सुटेना

News Desk

पदवीचे वाद तो सर्व बाबतीत बाद !

मोदी सरकार सर्वच आंदोलनांवर तोडगा काढण्यात अपयशी | मनमोहन सिंग

News Desk