HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

भाड में गया कानून और भाड में गयी आचारसंहिता, राऊतांचे वादग्रस्त वक्तव्य

मुंबई | लोकसभा निवडणुकीत प्रचार ऐन रंगात आला आहे. प्रत्येक राजकीय पक्ष, नेता आणि उमेदवार एकमेंकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत असताना. निवडणुकीच्या  प्रचार आणि भाषणादरम्यान अनेक नेत्यांची जीभ घसरते. या नेतेमंडळीची वादग्रस्त वक्तव्य करत आणि राजकारणी त्यांच्या भाषेची मर्यादा ओलांडतात. या नेत्यांच्या यादी नेहमी वादग्रस्त वक्तव्य करणारे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी थेट निवडणूक आयोगालाच आव्हान दिले आहे. ‘भाड मे गया कानून और भाड में गयी आचारसंहिता’, असे वादग्रस्त विधान राऊत यांनी केले आहे.

राऊत यांच्या या विधानामुळे त्यांनी थेट निवडणूक आयोगाला चेतावणी दिली आहे. ‘भाड मे गया कानून और भाड में गयी आचारसंहिता’, जो बात हमारे मन मैं है, वो अगर मन से बाहर ना निकाले गए तो घुटन सी होती है’, असे विधान राऊत यांनी केले आहे. राऊत यांच्या वक्तव्यानंतर निवडणूक आयोगाकडून कारवाई होणार का?, असा सवाल उपस्थित झाला आहे. परंतु विरोधकांडकडून कोणतीही मागणी करण्यात आली नाही. परंतु राऊत यांच्या विधाननंतर नेमके कोणते वळण घेणार याकडे सर्वांच लक्ष लागले आहे.

 

Related posts

भाजपाचा सभात्याग, कुमारस्वामींचे विधानसभेत बहुमत सिद्ध 

News Desk

सुजय विखे-बाळासाहेब थोरात यांच्या एकत्र विमान प्रवासामुळे राजकीय वर्तुळात चर्चा

News Desk

सरकार शब्दांचा खेळ खेळू पाहत आहे !

News Desk