नवी दिल्ली | निवडणूक आयोगाने काल (१० मार्च) लोकसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. ११ एप्रिल ते १९ मे रोजी दरम्यान देशभरात सात टप्प्यात लोकसभा निवडणुका घेण्यात येणार आहे. शेवटच्या टीन टप्प्यात उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि बिहार या तीन राज्यात मतदान होणार आहेत. या तिन्ही राज्यात मुस्लिम मतदारांच्या संख्येचे प्रमाण जास्त आहे.
Election Commission: During #Ramadan, polls are conducted as full month can not be excluded. However, date of main festival and Fridays are avoided for poll days. #LokSabhaElections2019 pic.twitter.com/i6NylD6WVB
— ANI (@ANI) March 11, 2019
त्यामुळे निवडणुकीच्या दरम्यान रमजान महिन्यात ठेवल्याने मतदानाचा टक्का घसरण्याची शक्यात असल्यामुळे मतदानाच्या तारखा बदलण्यात याव्या अशी मागणी मुस्लिम धर्मगुरुनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. शेवटच्या तीन टप्प्यात म्हणजे ६, १२ आणि १९ मे रोजी मतदान होणार आहे. या तिन्हीही तारखा रमजान महिन्यात येतात.
निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
या काळात मुस्लिम धर्मियांचा उपवास असतो. त्यामुळे मतदानाचा टक्का घसरु शकतो असे मुस्लिम धर्मगुरुंचे म्हणणे आहे. परंतु निवडणुका या ईद आणि रमजानच्या महिन्यातील कोणत्याही शुक्रवारच्या दिवशी मतदान ठेवण्यात आली नाही, असे निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.