HW News Marathi
राजकारण

वादग्रस्त विधानासाठी निवडणूक आयोग साध्वीवर करणार कारवाई ?

भोपाळ | भोपाळ लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह यांनी नथुराम गोडसे यांच्याबद्दल एक वादग्रस्त विधान केले होते. त्यांनंतर भाजपकडून प्रज्ञा सिंहला माफी मागण्यास सांगण्यात आले होते. त्यावर प्रज्ञा सिंहने जाहीर माफीही मागितली मात्र त्यांच्या या वक्तव्याची आता निवडणूक आयोगाने दखल घेतली असून मध्यप्रदेशच्या निवडणूक आयुक्तांकडून त्या वक्तव्याबाबतचा अहवाल मागविण्यात आला आहे. त्यामुळे साध्वीच्या अडचणीत आता वाढ होण्याची शक्यता आहे.

काही दिवसांपूर्वी अभिनेता कमल हासन यांनी महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसे यांना दहशतवादी संबोधले होते. त्यावर साध्वी यांना त्यांच्या रॅलीच्या वेळी प्रश्न विचारला असता त्यांनी नथुराम गोडसे हा देशभक्त होता, देशभक्त आहे आणि देशभक्त राहील असे विधान केले होते. यानंतर विरोधी पक्षाकडून साध्वीच्या या विधानाचा निषेध करण्यात आला. तर भाजपकडूनही त्यांना माफी मागण्यास सांगण्यात आले होते. भाजपचे प्रवक्ता जीव्हीएल नरसिंह राव यांनी साध्वीने जाहीर माफी मागावी असे सांगितले होते.

गेल्या काही दिवसात साध्वी प्रज्ञा सिंह यांनी केलेल्या विविध वादग्रस्त विधानाने त्या सतत चर्चेत राहील्या आहे. तर आता मध्यप्रदेशच्या निवडणूक आयुक्तांनी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी वादग्रस्त विधान केल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी असे म्हटले आहे. त्यामुळे आता साध्वी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जागतिक आरोग्य संघटनेच्या कारभाराविरुद्ध संजय राऊत बोलले तर वादळचं आलं

News Desk

देशाची अर्थव्यवस्था संकटात, नव्या अर्थमंत्र्यांनी मार्ग काढावा !

News Desk

वादग्रस्त वक्तव्यानंतर आता स्मृती इराणींची सारवासारव

Gauri Tilekar