HW News Marathi
राजकारण

पंढरपूरच्या सभेतून शिवसेना फुंकणार निवडणुकीचे रणशिंग

मुंबई | शिवेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राम मंदिर उभारण्याची मागणी करत अयोध्या दौरा केल्यानंतर आज (२४ डिसेंबर) थेट पंढरपुरातून हिंदुत्वाची हाक देणार आहेत. पंढरपूर वारीसाठी मुंबई, ठाणेसह राज्यातील विविध जिल्ह्यांतून शिवसैनिकांना या सभेसाठी पाचारण करण्यात आले आहे. या सभेसाठी २७ एकरांवरील चंद्रभागा मैदानावर तयारी सुरू आहे. पंढरीत राम मंदिराच्या मुद्यावरून शक्ती प्रदर्शन करून निवडणुकीचे रणशिंग फूंकण्याचा सेनेचा प्रयत्न असल्याचे बोलले जाते. पंढरपुरात सभा दुपारी ३ वाजता ही सभा होणार असून या सभेची सर्व जय्यत तयारी पूर्ण झालेली आहे.

उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणाऱ्या आरतीसाठी शिवसेनेनं इस्कॉन घाट चकाचक केला असला तरी चंद्रभागेची दुरावस्था मात्र कायम असल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. उद्धव ठाकरे आज सायंकाळी कुटुंबासह चंद्रभागेच्या पैलतीरावर असलेल्या इस्कॉन घाटावरून चंद्रभागेची महाआरती करणार आहेत. उद्धव ठाकरेंची महासभा आणि महाआरतीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त पंढरपूरात दाखल झाला असून नागरिकांनी कामाव्यतिरिक्त बाहेर पडू नये, असे आवाहन पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी केले आहे.

राज्यातील सेनेचा प्रमुख प्रतिस्पर्धी असलेल्या भाजपला लक्ष्य करून शिवसेनेची मोर्चेबांधणी सुरू करणार आहे. त्यामुळे राम मंदिराचा मुद्दा घेऊन भाजपवर टीका करण्याची संधी शिवसेनेचे नेते साधून घेत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी सौ. रश्मीताई ठाकरे, चिरंजीव आदित्य ठाकरे यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते, आमदार, खासदार, केंद्र आणि राज्य मंत्रिमंडळातील सदस्य सभेला उपस्थित राहणार आहेत. वारकरी संप्रदायातील महाराज मंडळींनाही शिवसेनेने आमंत्रण दिले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#RafaleDeal : संसदेत ‘कॅग’चा अहवाल सादर, विरोधकांची जोरदार प्रदर्शने

News Desk

आठवलेंच्या मेणाच्या पुतळ्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार उदघाटन

News Desk

काँग्रेसला आघाडीसाठी विचारुन थकलो पण काँग्रेस दादच देत नाही !

News Desk