HW News Marathi
राजकारण

#Elections2019 : जाणून घ्या…पालघर मतदारसंघाबाबत

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकांमधील सर्व मतदारसंघाबद्दल आपण जाणून घेत आहोत. लोकसभेमध्ये आपला प्रतिनिधी पाठवण्यासाठी आपण सर्वच मतदान करत असतो. मात्र ज्या नेत्याला पक्षाला आपण मत देतो त्याची माहिती करुन घेणेही महत्वाचे असते. महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकांमधील सर्व मतदारसंघाबद्दल आपण जाणून घेत आहोत. लोकसभेमध्ये आपला प्रतिनिधी पाठवण्यासाठी आपण सर्वच मतदान करत असतो. मात्र ज्या नेत्याला पक्षाला आपण मत देतो त्याची माहिती करुन घेणेही महत्वाच असते. महाराष्ट्रातील मतदानाचे ३ टप्पे पार पडले आहेत. आता केवळ महाराष्ट्रातील चौथा आणि शेवटचा टप्पा शिल्लक आहे. हा शेवटचा टप्पा २९ एप्रिल रोजी पार पडेल. तर निवडणुकांचे निकाल २३ मेला जाहीर होतील.

आज आपण पाहणार आहोत चौथ्या टप्यातील पालघर मतदार संघाबाबत. पालघर लोकसभा मतदार संघाच्या अंतर्गत ६ विधानसभेचे मतदारसंघ येतात. यामध्ये डहाणू, विक्रमगड, पालघर, बोईसर, नालासोपारा आणि वसई या मतदार संघाचा समावेश होतो.

उमेदवार कोण ?

पालघर मतदार संघातून यावेळी शिवसेनेचे राजेंद्र गावित, कॉंग्रेसचे सुरेश पडवी, बहुजन विकास आघाडीचे बाळाराम पाटील हे लोकसभेच्या रिंगणात आहे. त्याचबरोबर इतर काही पक्ष आणि अपक्ष मिळून एकूण १२ उमेदवार लोकसभेसाठी उभे आहे.

पालघरमध्ये २०१४ ची स्थिती

पालघरमध्ये २०१४ च्या निवडणुकीत भाजपकडून चिंतामण वानगा, बहुजन विकास आघाडीकडून बळीराम जाधव लोकसभेसाठी उभे होते. ज्यापैकी भाजपच्या चिंतामण वानगा यांचा ५,३३,२०१ मत मिळून विजय झाला होता. तर बळीराम जाधव यांना २,९३,६८१ इतकी मतं मिळाली होती. त्यांच्या मतांचा फरक पहिला तर २,९३,५२० इतक्या मतांनी चिंतामण वानगा यांचा विजय झाला होता. तसेच यांच्या मतांची टक्केवारी पाहिल्यास भाजपला ३३% तर बहुजन विकास आघाडीला १८ % मतं मिळाली होती.

पालघरमधील एकूण मतदार संख्या

पालघरमध्ये १८,१२,९८३ इतके एकूण मतदार आहेत. ८,३३,३०१ इतकी येथील महिला मतदारांची संख्या आहे. तर ९,४९,५९२ इतकी येथील पुरुष मतदारांची संख्या आहे.

पालघरमधील विधानसभेची स्थिती पाहिल्यास बोईसर, नालासोपारा, वसई हे ३ मतदारसंघ बहुजन विकास आघाडीकडे आहेत. तर विक्रमगड आणि डहाणू भाजपकडे आहे. तसेच पालघर मतदारसंघ शिवसेनेकडे आहे.

पालघर मतदारसंघाचा इतिहास

पालघर हा एकेकाळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला होता. मात्र मतदारसंघातील मक्तेदारी मोडून काढण्यात भाजप यशस्वी ठरली. पालघर लोकसभा मतदारसंघातून एमएमआरडीएच्या माध्यमातून अनेक विकास कामही झाली असल्याच सांगण्यात येते. तर, राजेंद्र गावितांनी वसई आणि नालासोपारा याभागात पाणी परिषद घेऊन आपले स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. तर दुसऱ्या बाजूने बहुजन विकास आघाडीही त्यांना आव्हान देताना दिसत आहे.

पालघर जिल्ह्यात अजूनही अनेक समस्या असल्याचे सांगितले जाते. ज्यामध्ये सागरी महामार्ग, एक्सप्रेस- वे, वाढवण बंदर यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्याचे येथील शेतकरी, नागरिक सांगतात. सोबतच जिल्ह्यातील कुपोषण, रोजगार या समस्याही आहे. आता यावेळी येथून शिवसेनेचे राजेंद्र गावित, कॉंग्रेसचे सुरेश पडवी आणि बहुजन विकास आघाडीचे बाळाराम पाटील लोकसभेसाठी उभे ठाकले आहे. तेव्हा आता राजेंद्र गावित आपली सत्ता राखू शकतात की निकाल काही वेगळे येतात.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुदत संपत असून यापुढे प्लास्टिक वापरायला मुदतवाढ देणार नाही | रामदास कदम

News Desk

देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारल्यानंतर राज ठाकरेंची घेणार भेट

Aprna

#LokSabhaElections2019 : खोतकरांची माघार, जालन्यातून दानवेंनाच मिळणार उमेदवारी ?

News Desk