HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

#Elections2019 : जाणून घ्या…सोलापूर मतदारसंघाबाबत

आगामी लोकसभा निवडणुका आता अवघ्या २ दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. आपला नेता किंवा आपल्या मतदारसंघातून उभा राहिलेला उमेदवार ज्यांना आपण विश्वास ठेऊन मत देतो, निवडून देतो त्यांच्याविषयी जाणून घेणे आवश्यक आहे. देशभरात एकूण ७ टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणुकांसाठीचे मतदान पार पडेल. त्यांपैकी पहिल्या टप्प्यातील ७ लोकसभेच्या जागांसाठीचे मतदान पार पडले आहे. ज्यामध्ये नागपूर, वर्धा, यवतमाळ-वाशीम, चंद्रपूर, गडचीरोली-चिमुर, भंडारा-गोंदिया, आणि रामटेक या मतदारसंघांचा समावेश होता. येत्या १८ एप्रिलला मतदानाचा दुसरा टप्पा पार पडेल. ज्यात महारष्ट्रातील इतर १० लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. ज्यामध्ये बुलढाणा, अकोला, अमरावती, हिंगोली,नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि सोलापूर या मतदार संघाचा समावेश होतो.

आज आपण बोलणार आहोत सोलापूर लोकसभा मतदार संघाबाबत. सोलापूर लोकसभा मतदार संघांतर्गत ६ विधानसभेचे मतदारसंघ येतात ज्यामध्ये सोलापूर दक्षिण,सोलापूर शहर मध्य, सोलापूर शहर उत्तर, मोहोळ, पंढरपूर, अक्कलकोट यांचा समावेश होतो. यापैकी ३ ठिकाणी कॉंग्रेस, २ ठिकाणी भाजप तर एका ठिकाणी राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता आहे.

उमेदवार कोण ?

सोलापूर मतदार संघातून यावेळी भाजपकडून डॉ श्रीजय सिध्देस्वर शिवाचार्य महास्वामीजी तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे आणि वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर निवडणूक लढविणार आहेत. इतर काही पक्ष आणि अपक्ष मिळून सोलापूरमधून एकूण १५ उमेदवार मैदानात उतरले आहेत.

सोलापूरमध्ये २०१४ ची स्थिती

सोलापूरमधून २०१४ साली भाजपचे शरद बनसोडे, कॉंग्रेसकडून सुशिलकुमार शिंदे आणि बहुजन समाज पक्षाकडून संजीव सदाफुले रिंगणात होते. त्यावेळी भाजपचे शरद बनसोडे यांचा ५,१७,८७९ मते मिळून विजय झाला होता. तर कॉंग्रेसच्या सुशिलकुमार शिंदे यांना ३,६८,२०५ मते मिळाली होती. यांच्यातील मतांचा फरक पहिला तर १,४९,६७४ इतक्या मोठ्या फरकानं भाजपचे शरद बनसोडे जिंकून आले होते. तर बहुजन समाज पक्षाच्या संजीव सदाफुले यांना १९,०४१ इतकी मते मिळाली होती. यांच्या मतांची टक्केवारी पाहील्यास भाजपला ५४% कॉंग्रेसला ३८% आणि आपला केवळ २% मतं मिळाली होती.

सोलापूर मतदारसंघातील मतदारांची संख्या

सोलापूर मतदारसंघाच्या एकूण मतदारांची संख्या १८,२०,२६१ असून या मतदारसंघातील एकूण महिला मतदारांची संख्या ८,७१,७१० इतकी आहे. तर पुरुष मतदारांची संख्या ९,४८,५१० इतकी आहे.

गेल्या निवडणुकीत भाजपच्या शरद बनसोडे यांनी काँग्रेसच्या सुधीलकुमार शिंदे यांचा जवळजवळ दीड लाख मतांनी पराभव केला. परंतु शरद बनसोडे यांची कारकीर्द असमाधानकारकच राहिली. शरद बनसोडे पुन्हा उमेदवार नकोत असेच भाजपतून म्हटले जाऊ लागले. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत भाजपकडून जातीय समीकरणे आणि मतांची विभागणी लक्षात घेऊन लिंगायत समाजाचे स्वामी डॉक्टर जयसिद्धेश्वर स्वामी यांना मैदानात उतरवण्यात आले आहे.

सोलापूरची तिरंगी लढत

गेल्या निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी वयाच्या ७० मध्ये सुशीलकुमार शिंदे पुन्हा दंड थोपटून रिंगणात उभे आहेत. तर तिकडे वंचित बहुजन आघाडीकडून स्वतः प्रकाश आंबेडकर निवडणूक लढवत आहेत. सोलापूरमध्ये मराठा, दलित आणि लिंगायत, मुस्लिम या समाजाची मते महत्वाची आहेत. त्यामुळे सोलापूरमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळेल. सुशीलकुमार शिंदे आपला बाल्लेकिल्ला राखणार ? भाजप आपली जागा कायम ठेवणार ? कि सोलापूरला प्रकाश आंबेडकरांसारखा नवीन खासदार मिळणार ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे .

Related posts

‘नमो अ‍ॅप’च्या माध्यमातून पंतप्रधान मोदी जाणून घेणार लोकांचा कौल

News Desk

कोस्टल रोडचे काम थांबवा, उच्च न्यायालयाचे पालिकेला आदेश

News Desk

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण | तिन्ही महिला आरोपींना ३१ मेपर्यंत पोलीस कोठडी

News Desk