HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

#Elections2019 : जाणून घ्या…अकोला मतदारसंघाबाबत

आगामी लोकसभा निवडणुका आता अवघ्या २ दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. आपला नेता किंवा आपल्या मतदारसंघातून उभा राहिलेला उमेदवार ज्यांना आपण विश्वास ठेऊन मत देतो, निवडून देतो त्यांच्याविषयी जाणून घेणे आवश्यक आहे. देशभरात एकूण ७ टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणुकांसाठीचे मतदान पार पडेल. त्यांपैकी पहिल्या टप्प्यातील ७ लोकसभेच्या जागांसाठीचे मतदान पार पडले आहे. येत्या १८ एप्रिलला मतदानाचा दुसरा टप्पा पार पडेल. ज्यात महारष्ट्रातील इतर १० लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. अजून महाराष्ट्रातील ३ टप्पे शिल्लक आहे. ज्यामध्ये उर्वरित मतदारसंघात निवडणुका होणार आहे. हे तीन टप्पे १८ एप्रिल, २३ एप्रिल, आणि शेवटचा टप्पा २९ एप्रिला असणार आहे.

आज आपण पाहणार दुसऱ्या टप्यातील अकोला मतदार मतदार संघाबाबत जाणून घेऊया. अकोला लोकसभा मतदार संघाच्या अंतर्गत ६ विधानसभेचे मतदारसंघ येतात ज्यामध्ये अकोट, बळापूर, अकोला पूर्व, अकोला पश्चिम, मुर्तीजापूर आणि रिसोड यांचा समावेश होतो.

उमेदवार कोण ?

अकोला मतदार संघातून यावेळी भाजपकडून संजय धोत्रे, कॉंग्रेस कडून हिदायत पटेल, तर वंचित बहुजन आघाडीचे अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर हे लोकसभेच्या रिंगणात उतरले आहे. त्याच बरोबर बहूजन समाज पक्षाचे भाई बी.सी कांबळे आणि इतर काही पक्ष आणि अपक्ष मिळून एकूण ११ उमेदवार अकोल्यातून लोकसभेच्या मैदानेत उतरले आहे.

अकोल्यामध्ये २०१४ ची स्थिती

अकोल्यामधून २०१४ साली भाजपचे संजय धोत्रे, कॉंग्रेसचे हिदायत उल्ला पटेल तर भारिप बहुजन महासंघाकडून प्रकाश आंबेडकर हे लोकसभेसाठी उभे होते. त्यापैकी भाजपच्या संजय धोत्रे यांचा ४,५६,४७२ मते मिळून विजय झाला होता. तर काँग्रेसचे हिदायत पटेल यांना २,५३,३५६ इतकी मते मिळाली होती. त्यांच्या मतांचा फरक पहिला तर १,४९,६७४ इतक्या मतांनी भाजपच्या संजय धोत्रे यांचा विजय झाला होता. त्यांच्या मतांची टक्केवारी पहिली तर भाजपला २७ %, कॉंग्रेसला १५ % ,तर भरिप बहूजन महासंघाला १४ % मते मिळाली होती.

अकोला मतदारसंघातील मतदारांची संख्या

अकोल्यात १८,५४,७८३ इतके एकूण मतदार आहेत. येथील महिला मतदारांची संख्या ८,९२,१६० इतकी आहे तर पुरुष मतदारांची संख्या ९,६२,५७८ इतकी आहे.

अकोला मतदारसंघाचा इतिहास

अकोल्यातील इतिहास पहिला तर जवळपास २५ वर्षे येथील सत्ता कॉंग्रेसच्याच ताब्यात होती. तर मागील ३ लोकसभा निवडणुकांमध्ये येथे भाजपचे संजय धोत्रेच जिंकून येत आहेत. शेतकरी आत्महत्या, दुष्काळ, रोजगार, रस्त्यांचा रखडलेला विकास या येथील विशेष समस्या आहेत. तर २०२४ मध्ये संजय धोत्रे यांनी शेतकऱ्यांबाबत एक आक्षेपार्ह विधान करुन शेतकऱ्यांप्रती अनास्था दर्शवली होती. तर गेल्या ५ वर्षात अकोला आणि आसपासच्या या समस्या फारश्या बदलल्या नाही. गेल्या ५ वर्षात त्यांनी लोकसभेत ८४ टक्के उपस्थिती दर्शविली. तर ६३१ प्रश्नही उपस्थित केले. समस्याचं काय ? असा प्रश्नही येथून उपस्थित होताना दिसत आहे. आता २०१९ च्या लोकसभेसाठी त्यांच्या विरोधात भरिप बहूजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर, त्याचबरोबर कॉंग्रेस कडून हिदायत पटेल उभे ठाकले आहे. म्हणजे अकोल्यातील ही लढत तिरंगी होणार हे दिसून येत आहे.

Related posts

नयनतारा सहगल यांना आमचा विरोध नाही !

News Desk

सनी देओल यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश, गुरुदासपूरमधून निवडणूक लढविण्याची शक्यता

News Desk

नवमतदारांनो, आपले पहिले मत हे वीर जवानांना समर्पित करा !

News Desk