HW News Marathi
राजकारण

#Elections2019 : जाणून घ्या…दिंडोरी मतदार संघाबाबत

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकांमधील सर्व मतदारसंघाबद्दल आपण जाणून घेत आहोत. लोकसभेमध्ये आपला प्रतिनिधी पाठवण्यासाठी आपण सर्वच मतदान करत असतो. मात्र ज्या नेत्याला पक्षाला आपण मत देतो त्याची माहिती करुन घेणेही महत्वाचे असते. महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकांमधील सर्व मतदारसंघाबद्दल आपण जाणून घेत आहोत. लोकसभेमध्ये आपला प्रतिनिधी पाठवण्यासाठी आपण सर्वच मतदान करत असतो. मात्र ज्या नेत्याला पक्षाला आपण मत देतो त्याची माहिती करुन घेणेही महत्वाच असते. महाराष्ट्रातील मतदानाचे ३ टप्पे पार पडले आहेत. आता केवळ महाराष्ट्रातील चौथा आणि शेवटचा टप्पा शिल्लक आहे. हा शेवटचा टप्पा २९ एप्रिल रोजी पार पडेल.

आज आपण पाहणार आहोत चौथ्या टप्यातील दिंडोरी मतदार संघाबाबत. दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या अंतर्गत ६ विधानसभेचे मतदारसंघ येतात. यामध्ये नांदगाव, कळवण, चांदवड, येवला, निफाड, आणि दिंडोरी या मतदार संघाचा समावेश होतो.

उमेदवार कोण ?

दिंडोरी मतदार संघातून यावेळी भाजपकडून भारती पवार, काँग्रेसकडून धनराज महाले तर बहुजन विकास आघाडीकडून बापू बर्डे लोकसभेच्या मैदानात आहे. तसेच इतर काही पक्ष आणि अपक्ष मिळून एकुण ८ उमेदवार मैदानात उतरले आहे.

दिंडोरीमधील २०१४ ची स्थिती

दिंडोरीमध्ये २०१४ च्या निवडणुकीत भाजपकडून देवराम चव्हाण, राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून डॉ. भारती पवार तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून हेमंत वाघेरे हे लोकसभेच्या रिंगणात होते. त्यापैकी भाजपच्या देवराम चव्हाण यांना ५,४२,७८४ इतकी मतं मिळून विजय झाला होता. तर राष्ट्रवादीच्या डॉ.भारती पवार यांना २,९५,१६५ इतकी मतं मिळाली होती. त्यांच्या मतांचा फरक पहिला तर २,४७,६१९ इतक्या मतांनी भाजपच्या देवराम चव्हाण यांचा विजय झाला होता. त्याचबरोबर यांच्या मतांची टक्केवारी पाहिल्यास भाजपला ३५ % राष्ट्रवादीला १९ % तर सीपीएमला केवळ ४ % मतं मिळाली होती.

दिंडोरीमधील एकूण मतदार संख्या

दिंडोरीमध्ये एकूण १७,०१,०४० मतदार आहेत. महिला मतदारांची संख्या ८,१३,४९९ इतकी असून ८,८७,५३६ इतकी पुरुष मतदारांची संख्या आहे.

शिवसेनेचा हातभार लागल्यास भाजप उमेदवाराला फायदा

दिंडोरी मतदार संघात आदिवासी मतदार मोठ्या प्रमाणात आहे. या मतदार संघात पूर्वी कॉंग्रेस आणि जनता दलाचा बोलबाला राहिला. मात्र गेल्या ३ निवडणूकांपासून हा मतदार संघ भाजपच्या हरिश्चंद्र चव्हाण यांच्याकडे आहे. येथील विधानसभा मतदार संघाची स्थिती पाहिल्यास येथील ३ ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. तर १ मतदारसंघात भाजपची सत्ता आहे. तर इतर २ मतदारसंघात माकप आणि शिवसेनेची सत्ता आहे.

दिंडोरी मतदार संघ आदिवासीबहुल असल्याने येथील आदिवासींचा महत्वाचा वनजमिनीचा प्रश्न, सिंचनाचा प्रश्न, कांद्याचा प्रश्न अजूनही सुटले नसल्याचे सांगण्यात येते. त्याचबरोबर बेरोजगारीचा प्रश्नदेखील मोठा असल्याचे बोलले जाते. मात्र आता येथे शिवसेना आणि भाजप युतीचा फायदा होण्याची शक्यताही असल्याचे सांगण्यात येते. कारण, युतीमध्ये ही जागा भाजपकडे आहे. त्यामुळे शिवसेनेचा हातभार लागल्यास भाजप उमेदवाराला त्याचा फायदा होऊ शकतो. तेव्हा यावेळी एकमेकांसमोर उभे ठाकलेले भारती पवार आणि धनराच महाले तसेच बापु बर्डे यांच्यापैकी कुणाचे पारड जड होते, ते निकाल आल्यावरच कळेल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…भाजपच्या बोक्यांच्या तोंडी आयताच लोण्याचा गोळा पडू नये”, सामनातून काँग्रेसला सल्ला

Aprna

पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात उभे असलेल्या तेज बहादूर यांची उमेदवारी रद्द

News Desk

उद्याच सादर होणार मराठा आरक्षणाचा एटीआर

News Desk