HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

#Elections2019 : जाणून घ्या…गडचिरोली-चिमूर मतदारसंघाबाबत

आगामी लोकसभा निवडणुका आता अवघ्या २ दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. आपला नेता किंवा आपल्या मतदारसंघातून उभा राहिलेला उमेदवार ज्यांना आपण विश्वास ठेऊन मत देतो, निवडून देतो त्यांच्याविषयी जाणून घेणे आवश्यक आहे. यापूर्वी आपण वर्धा, नागपूर, यवतमाळ-वाशिम, चंद्रपूर या मतदारसंघाबद्दल तेथील उमेदवारांबद्दल जाणून घेतले आहे.

आता आज आपण गडचिरोली-चिमूर या लोकसभा मतदारसंघाबद्दल जाणून घेऊया. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेलगतचा भाग आहे. या ठिकाणच्या रहिवाश्यांमध्ये आदिवासी लोकांचे प्रमाण मोठे आहे. गडचिरोली-चिमूर या लोकसभा मतदारसंघाअंतर्गत विधानसभेचे ६ मतदार संघ येतात. ज्यामध्ये आमगाव, आरमोरी, गडचिरोली, अहेरी, ब्रम्हपूरी आणि चिमूर.

उमेदवार कोण ?

गडचिरोली-चिमूर या मतदार संघातून यावेळी भाजपकडून अशोक नेते तर कॉंग्रेसकडून डॉ.नामदेव उसेंडी हे लोकसभेसाठी उभे आहेत. त्याचबरोबर बसपकडून हरीचंद्र मंगम, आंबेडकराइट पार्टी ऑफ इंडियाकडून मनोबा नन्नावरे आणि वंचित बहुजन आघाडीकडून डॉ. रमेशकुमार गजाबे असे एकूण ५ उमेदवार मैदानात उतरले आहेत.

गडचिरोली – चिमूर मतदारसंघाची २०१४ ची स्थिती

गडचिरोली – चिमूर मतदारसंघामधून भाजप उमेदवार अशोक नेते, कॉंग्रेस उमेदवार नामदेव उसेंडी,तर बसपचे रामराव नन्नावारे हे लोकसभेसाठी उभे होते. त्यावेळी भाजपच्या अशोक नेते यांना ५,३५,९८२ इतके मत मिळाली होती. तर कॉंग्रेसच्या नामदेव उसेंडी यांना २,९९,११२ इतके मतं मिळाली होती. जवळपास २,३६,८७० मतांच्या फरकांनी भाजपच्या अशोक नेते यांचा विजय झाला होता. त्यांच्या मतांची टक्केवारी पाहील्यास भाजपला ३६ टक्के कॉंग्रेसला २० टक्के आणि बसपला केवळ ४ टक्के मत मिळाली होती.

मतदारसंघातील उमेदवारांची संख्या

गडचिरोली – चिमूर मतदारसंघाच्या एकूण मतदारांची संख्या १४,६८,४३७ इतकी असून त्यापैकी महिला मतदारांची संख्या ७,१५,६८६ तर पुरुष मतदारांची संख्या ७,५२,७५१ इतकी आहे.

महारष्ट्रातील विस्ताराने सर्वात मोठा मतदार संघ

गडचिरोली हा मतदार संघ महारष्ट्रातील विस्ताराने सर्वात मोठा मतदार संघ आहे. अनूसुचित जातीसाठी येथील जागा राखीव आहे. सर्वधिक मागास आणि आदिवासी बहूल असा भाग गडचिरोली जिल्ह्यात आहे. त्यामूळे येथे प्रचार, प्रसारासाठी उमेदवारांपुढे मोठे आव्हान होते.

सध्या हा मतदार संघ भाजपच्या खात्यात आहे. मात्र २०१४ मध्ये दिलेले आपले आश्वासन त्यांनी पूर्ण केले नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दल नाराजीचा सूर या ठिकाणी दिसून येतो. मात्र येथील नगरपालिका, नगर पंचायत, आणि जिल्हा परिषद या तिन्ही ठिकाणी भाजपची सत्ता असल्याने ती एक जमेची बाजू भाजपच्या अशोक नेते यांच्यासाठी असल्याचे देखील बोलले जात आहे.

मतदारसंघाचा इतिहास

येथील इतिहास पहिला तर १९६७ मध्ये ही लोकसभेची जागा अस्तित्वात आली होती. तेव्हापासून आजपर्यंत २०१४ पर्यंत कॉंग्रेसने ७ वेळा आपली सत्ता राखली होती. तर २०१४ मध्ये भाजपने या जागेला आपल्या ताब्यात घेतले. आता देखील १४ प्रमाणेच भाजपचे अशोक नेते आणि कॉंग्रेसचे नामदेव उसेंडी एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.

Related posts

भाजप काँग्रेसला घाबरल्यामुळे मला नजरकैद | संजय निरुपम

News Desk

नोटाबंदीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम झाला | मनमोहन सिंग

Shweta Khamkar

लोकांनी लग्नात पेट्रोल, डिझेल आहेर म्हणून द्यावे | सचिन सावंत

News Desk