HW News Marathi
राजकारण

#ElectionsResultsWithHW Live Updates : भाजपला स्पष्ट बहुमत, पुन्हा एका मोदी सरकार

नवी दिल्ली | लोकशाहीचा उत्सव समजल्या जाणाऱ्या लोकसभा निवडणुकीचा आज (२३ मे) निकाल लागणार आहे. गेल्या दीड महिन्यापासून देशभरात १७ व्या लोकसभा निवडणुकीची धामधुम सुरू होती. निवडणुकीच्या काळात अनेक दिग्गज नेत्यांनी ऐकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैऱ्या झाडल्या आहे.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्यानेतृत्वाखालील एनडीए विरुद्ध काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए आणि इतर पक्ष अशी लढत झाली आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीचे मतदान आटोपल्यानंतर विविध वृत्तवाहिन्यांनी एक्झिट पोल प्रसिद्ध केले आहेत. त्यापैकी एक्झिट पोलपैकी बहुतांश पोलमध्ये केंद्रात पुन्हा एकदा एनडीएला बहुमत मिळून नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान होतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, भाजप अध्यक्ष अमित शहा, पूर्व उत्तर प्रदेश महासचिव प्रियांका गांधी वाड्रा, राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, कॅबिनेट मंत्री नितीन गडकरी, पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आदी दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

Live Updates

 

वाराणसी – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसीमधून विजयी झाले आहे.

  • गुजरात – गांधीनतरमधून अमित शहा ५१११८० मतांनी आघाडीवर आहे
  • रशियाचे पंतप्रधान पुतिन यांनी देखील शुभेच्या दिल्या आहेत
  • जापाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन करून शुभेच्छा दिल्या

 

  • चीनचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोनवरून शुभेच्छा दिल्या आहेत

 

  • तेलंगना – टीआएस ८ जागांनी आघाडीवर असून केसीआर यांची कन्या आघाडीवर असल्याची माहिती मिळणार आहे

 

  • अमेठी – स्मृती इराणी आघाडीवर असून राहुल गांधी ११ हजार २२६ मतांनी पिछाडीवर आहेत

 

  • पटणा साहेब – भाजपचे रविशंकर प्रसाद आघाडी तर काँग्रेस शत्रुघ्न सिन्हा पिछाडी
  • पश्चिम बंगाल – असनोलमधून भाजपचे बाबूल सप्रियो ६५०० मतांनी आघाडीवर असून तृणमूल काँग्रेस मागे आहेत.

  • भाजपला ३०१ तर काँग्रेसला ५० जागा मिळाल्या आहेत.
  • औरंगाबादमध्ये वंचित बहुजन आघाडीचे इम्तियाज जलील आघाडीवर असून त्यांना ३५ हजार मते मिळाली आहे.
  • इस्त्राईलचे पंतप्रधान बेजिलम नेत्यानाहू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच अभिनंद करणारे ट्वीट केले आहे.

 

  • महाराष्ट्र – मुंबई भाजप कार्यलयाबाहेर जल्लोषाचे वातावरण
  • पश्चिम बंगाल – कॅबिनेट मंत्री बाबूल सुप्रियो असनसोल मतदार संघातून आघाडी, बरखापूरमधून अर्जून सिंग तर टीएमसीमधून मिमि चक्रवर्ती जादवपूर मतदार संघातून आघाडीवर आहे.

  • भाजपला देशभरात २९२ जागा मिळाल्यामुळे देलगू देसम पार्टीचे अध्यक्ष आणि तेलगंनाचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू राजनामा देणार आहेत

 

  • पश्चिम बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष

  • असद्ददीन औवेसी हैदराबाद मतदार संघातून ८५ हजार मतांनी आघाडीवर आहे.

  • महाराष्ट्र – सोलापूर मतदार संघातून सुशीलकुमार शिंदे तर बारामती मतदार संघातून सुप्रिया सुळे आघाडीवर आहे.

 

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी आज भाजपच्या मुख्य कार्यालयात सायंकाळी ५.३० भाजपच्या दिग्गज नेत्यांची बैठक बोलवली आहे.

 

  • मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून भाजला २९२ जागा मिळाल्यानंतर ऑस्ट्रेलियामध्ये जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

  • ओडिसा – केंद्रापाडा मतदार संघातून भाजपमधून जया पांडा आघाडीवर आहे.

  • भोपाळ – भाजपच्या साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर भोपाळ मतदार संघातून आघाडीवर आहे. नक्कीच माझा विजय होणार, माझा विजय हा धर्माचा विजय असून अधर्माचा नाश होणार असल्याचे सांगत प्रज्ञा सिंग हिने जनतेचे आभार मानले आहे.

 

  • ओडिसा – पुरी मतदार संघातून भाजपचे प्रवक्ता डॉ. सबीत पात्रा ७०० मतांनी आघाडीवर आहे.

 

  • काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्या सिंधिया मध्य प्रदेशाच्या गुनामधून आघाडी

 

  • कॅबिनेट मंत्री मेनका गांधी सुल्तानपूर तर मनोज सिंहा गाझीपूरमधून आघाडीवर आहेत.

  • गुजरात – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गांधीनगर यांच्या निवासस्थानी त्यांच्या मातोश्री हिराबेन यांनी उपस्थिती मोदी समर्थकांचे अभिवादन केले.

  • अमेठीमधून भाजपच्या स्मृती इराणी ७ हजार ३०० मतांनी आघाडीवर आहेत

 

  • दिल्ली – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वाड्रा यांच्या घरा बाहेर शांततेचे वातावरण पहायला मिळत आहे.

  • काँग्रेस नेते शशीर थरूर तिरुअनंतपूरममधून १३ हजार मतांनी आघाडीवर आहे.

  • पंजाब – काँग्रेसचे मनिष तिवारी आनंदपूर साहिबमधून आघाडी तर सरोमनी अकाली दलच्या हरमिंदर कौर बादल भटिंडामधून आघाडी आहे. तसेच आपचे भगवत मान सनगुरमतदार संघातून आघाडीवर आहे.

  • कर्नाटक – डीएमकेच्या मुख्यालयात जल्लोषाचे वातवरण सुरू आहे.

  • भाजप देशभरात २९५ जागांवर आघाडी असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

  • निवडणूक आयोगाने देशभरातील आता अधिकृत माहितीनुसार भाजप २९५ जागांनी आघाडीवर तर काँग्रेस ५१ जागांनी पिछाडीवर आहे.

  • अमेठी मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार स्मृती इराणी ४ हजार ३०० मतांनी आघाडीवर आहे.

  • गुजरात – गांधीनगरमधून भाजप अध्यक्ष अमित शहा १ लाख २५ हजार मतांनी पुढे आहे.

 

  • काश्मीरची माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती अनंदनागमधून आघाडीवर आहे.

  • शेअर बाजार – ४०,०१५.४९ उच्चांक गाढला आहे.

  • छत्तीसगढ – भाजप ९ जागांनी आघाडी तर काँग्रेस २ जागांनी पिछाडीवर आहे

  • भाजप-शिवसेनची युती मुंबईच्या सहाही जागांवर आघाडीवर आहे.

  • बेंगलुरुमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष

  • अपक्ष उमेदवार सुमंतला अंबरीश १२०० मतांनी आघाडीवर आहे. तर कर्नाटकातील मांड्यामधून जेडीएसचे कुमारस्वामीचे मुलगा निखील कुमारस्वामी आघाडी

 

  • निवडणूक आयोगाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार भाजप २७९ जागांवर आघाडी तर काँग्रेस ५१ जागांवर पिछाडीवर आहे

 

  • पंजाब – काँग्रेस ८ जागा तर भाजप २ जागांवर आघाडीवर आहे.

  • भाजप दिल्लीच्या सातही जागांवर आघाडीवर आहे

  • वाराणसी – पंतप्रधान नरेंद्र मोदी २० हजार मतांनी आघाडी, गुजराजमधील गांधीनगरमधून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा ५० हजार मतांनी आघाडीवर आहेत.

  • जम्मू-काश्मीर – नॅशनल कॉन्फरॅन्सचे अध्यक्ष फारुक अब्दुला श्रीनगर, तर जितेंद्र सिंग आघाडीवर आहे.

  • कर्नाटक – जेडीएसचे अध्यक्ष कुमारस्वामी मंड्या मतदार संघातून आघाडी तर सुमनलाथा अंबरेष हा अपक्ष उमेदवार देखील आघाडवीर आहे.

  • पटणासाहेबमधून भाजपचे रविशंकर प्रसाद आघाडीवर तर काँग्रेसचे शत्रुघ्न सिन्हा पिछाडीवर आहे

  • निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार चंदनी चौक, उतर पश्चिम दिल्ली, दक्षिण दिल्ली आणि पश्चिम दिल्लीमधून भाजप आघाडीवर आहे.

  • तृणमूल काँग्रेसचे अभिषेक बॅनर्जी डायमंड हार्बर मतदार संघातून आघाडीवर आहे.

  • सुल्तानपूरमधून भाजपच्या कॅबिनेट मंत्री मेनका गांधी आघाडी तर रायबरेलीमधून युपीए अध्यक्ष सोनिया गांधी आघाडी आणि भाजपमधून वरुन गांधी पिलीभिटमधून आघाडीवर आहेत.

  • निवडणूक आयोगाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार भाजप देशभारात आतापर्यंत २२९ जागांनी आघाडी तर काँग्रेस ५६ जागांनी पिछाडीवर आहेत.

  • तामिळाडून – काँग्रेस पुद्दुचेरी मतदार संघातून आघाडी तर डीएमके डिंडीगुल व कुड्डालोरमधून आघाडी

  • काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे गुलबर्गा मतदारसंघातून पिछाडीवर
  • कर्नाटक – दक्षिण बंगळुरू मतदारसंघातून भाजपचे युवा नेते तेजस्वी सूर्या आघाडीवर

  • लोकसभा निवडणुकीच्या निकाल लागण्यास सुरुवता झाल्यानंतर शेअर बाजाराने उच्चांक गाढला आहे..

  • निवडणूक आयोगाकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार भाजप देशपातळीवर १६२ जागांनी आघाडी तर काँग्रेस ५१ जागांवर पिछाडीवर आहेत.

  • पंजाब – गुरुदासपूरमधून अभिनेता सनी देओल, अनंदपूर साहेबमधून काँग्रेसचे मनिष तिवारी, काँग्रेसचे अमृतसर मतदार संघातून गुरजीत सिंग अहुजा आघाडीवर आहेत. तर सरोमनी अकाली दलच्या हरमिंदर कौर बादल भटिंडामधून आघाडीवर आहे

  • युपीए अध्यक्ष सोनिया गांधी उत्तर प्रदेशाच्या रायबरेली मधून आघाडीवर आहेत. तर राहुल गांधी केरळच्या वायनाडमधून आघाडी घेतली आहे.

  • दिल्ली – राहुल गांधींच्या विजयासाठी त्यांच्या निवासस्थानाबाहेर हवन

  • मध्य प्रदेश – भोपाळ मतदार संघातून काँग्रेस ज्येष्ठ नेते दिग्विंजय सिंग, गुना मतदार संघातील पश्चिम उत्तर प्रदेशातील महासचिव ज्योतिरादित्य सिंधिया तर जबलपूरमधून विवेक तंखा मध्य प्रदेशातून आघाडीवर आहेत.

  • पंजाब – गुरुदासपूर मतमोजणीला केंद्रला सुरुवता
  • पहिल्या फेरीत – भोपाळ मतदारसंघातून भाजपच्या साध्वी प्रज्ञा सिंग ३ हजार मतांनी आघाडीवर आहे.

  • भोपाळ मतदारसंघातील भाजपच्या साध्वी प्रज्ञा सिंग आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांच्या मतदान संघातील मतमोजणी केंद्र

  • पहिल्या फेरीत – स्मृती इराणी अमेठीमधून २ हजार मतांनी आघाडीवर आहे
  • निवडणूक आयोगाच्या अधिकृत आकडेवारीनुसार भाजपा 9 आणि काँग्रेस 3 जागांवर आघाडीवर

  • गांधीनगर – भाजपाध्यक्ष अमित शहा २५ हजार मतांनी आघाडीवर
  • बेगुसरायमधून भाजपचे गिराज सिंग आघाडीवर तर कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे कन्हैया कुमार पिछाडी
  • वाराणसी – वाराणसी लोकसभा मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आघाडीवर
  • अमेठी मधून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी १९ मतांनी पिछाडीवर असून स्मृती इराणी आघाडीवर आहेत
  • राहुल गांधी वायनाड आघाडी
  • उत्तर प्रदेश – मोदींचा विजय व्हावा म्हणून उत्तर प्रदेशच्या अलिगढमध्ये हवन

  • दिल्ली – सिरी फोर्ट कॉम्प्लेक्समधून मतमोजणीचे करण्यास सुरुवात

  • बेंगलुरू – माऊंट कॅरेमल कॉले येथील मतमोजणीस सुरुवात

  • देशभरातील मतमोजणीला आता सुरुवात झाली आहे.

  • काँग्रेस उमेदवार संजय निरुपम यांनी निकलांपूर्वी घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन

  • उत्तराखंड – मतमोजणील सुरुवात झाली आहे.

  • केरळ – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी वायनाडमधील मतमोजणी केंद्रा बाहेरील परिस्थिती

  • पश्चिम बंगाल – निवडणूक मतमोजणीची तयारी पूर्ण

  • मुंबई – भोजपुरी अभिनेता रविकिशन उत्तर प्रदेशाच्या गोरखपूर मतदार संघातून लोकसभा निवडणूक लढणार आहे. रविकिशन यांनी कुटुंबियांसोबत पूजा करत विजया होण्याची प्रार्थना केली

  • नवी दिल्ली – लोकसभेचा निकाल काँग्रेसच्याच बाजूने लागेल आणि सत्ता स्थापन करेल – अजय माकन

  • लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीची तयारी पूर्ण, थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#LokSabhaElections2019 : शिवसेनेची पहिली यादी जाहीर, २१ उमेदवारांच्या नावांचा समावेश

News Desk

भाजपचा विजय, लोकशाहीचा पराभव | राहुल गांधी

News Desk

“कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र हा केंद्रशासित करा”, उद्धव ठाकरेंची मागणी

Aprna