HW News Marathi
राजकारण

#ElectionsResultsWithHW Live Updates : राज्यातील निकाल येण्यास सुरुवात, महायुतीची सरशी

मुंबई | देशातील १७ व्या लोकसभा निवडणुकीचा निकाल आज (२३ मे ) लागणार आहे. देशभरात मतमोजणीला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ जागांच्या मतमोजणीला देखील सुरुवात झाली आहे. राज्यात चार टप्प्यांत झालेल्या निवडणुकीत एकूण ९८,४३० इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचा (ईव्हीएम) वापर करण्यात आला. आज राज्यातील ३८ ठिकाणी ४८ केंद्रावर मतमोजणी होणार आहे. राज्यात ११, १८, २३ आणि २९ एप्रिल अशा चार टप्प्यांत मतदान झाले. राज्यांत ८६७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

राज्यात २०१४ मधील निवडणुकीत ६०.३२ टक्के मतदान झाले होते. तर यंदा किंचित अधिक म्हणजे ६०.८० टक्के मतदानाची नोंद झाली. यंदाच्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (नागपूर), हंसराज अहिर (चंद्रपूर), सुभाष भामरे (धुळे), अनंत गीते (रायगड), महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण (नांदेड), माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे (सोलापूर) या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

Lok Sabha Elections 2019 MAHARASHTRA LIVE UPDATE

  • लोकसभेच्या निकालानंतर अचानक देशातील जनतेचे “चौकीदार” अदृश्य !

  • नागपूर मतदारसंघातून भाजप नेते नितीन गडकरी यांचा विजय
  • उस्मानाबाद मतदारसंघातून ओमराजे निंबाळकर यांचा विजय
  • हिंगोली मतदारसंघातून शिवसेनेचे हेमंत पाटील विजयी
  • बुलढाणा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव विजयी, कार्यकर्त्यांचा जल्लोष

  • अमरावतीच्या महाआघाडीच्या उमेदवार नवनीत कौर राणा विजयाच्या उंबरठ्यावर

  • पालघर मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र गावित विजयी
  • उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून भाजप उमेदवार पूनम महाजन विजयी
  • शिवसेना भवनाबाहेर शिवसैनिकांचा मोठा जल्लोष

  • वाराणसी लोकसभा मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मोठा विजय

  • नांदेड मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार अशोक चव्हाण यांचा पराभव

  • मी जनतेचा कौल मान्य करतो. मात्र लोकांनी एव्हीएमबद्दल संशय व्यक्त केला आहे, हे देखील लक्षात घ्यायला हवे.

  • अकोला मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर पिछाडीवर
  • मावळ मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांचा जवळपास १ लाख मतांनी पराभव, शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांचा विजय
  • शिरूर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अमोल कोल्हे विजयी, शिवसेना उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना मोठा धक्का
  • बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुप्रिया सुळे १ लाख मतांनी विजयी, भाजप उमेदवार कांचन कुल यांचा पराभव
  • जालना मतदारसंघातून भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवे १ लाख २८ हजार १४० मतांनी विजयी
  • रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून शिवसेना उमेदवार विनायक राऊत विजयी
  • कल्याण मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार श्रीकांत शिंदे विजयी
  • ठाणे मतदारसंघातून शिवसेना उमेदवार राजन विचारे विजयी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आनंद परांजपे यांचा पराभव
  • अहमदनगर मतदारसंघातून भाजपचे उमेदवार डॉ.सुजय विखे पाटील विजयी. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संग्राम जगताप यांचा पराभव
  • रायगड मतदारसंघातून शिवसेना उमेदवार अनंत गीते यांचा पराभव, अनंत गीते यांचा २१,००० मतांनी पराभव झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे विजयी.
  • बीड मतदारसंघामधून प्रीतम मुंडे यांना १०३५८८ ची आघाडी
  • औरंगाबाद मतदारसंघातून इम्‍तियाज जलील यांना ३२७४१ ची आघाडी
  • पालघर मतदारसंघ

  • अमरावती मतदारसंघ

आनंदराव अडसूळ (शिवसेना) -१६०५५०

नवनीत राणा (राष्ट्रवादी काँग्रेस) – १५१४२५

अमरावती मतदारसंघात आनंदराव अडसूळ आघाडीवर

  • सोलापूरमधील काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे पिछाडीवर तर बारामतीत राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळेंची आघाडी

  • साताऱ्यात उदयनराजेंची ९ हजारांपेक्षा अधिक मतांनी आघाडी
  • बीड मतदारसंघातून प्रीतम मुंडे यांची आघाडीवर
  • अहमदनगरमधून सुजय विखे पाटील ७४ हजार मतांनी पुढे
  • उत्तर मुंबई मतदारसंघ – दुसरी फेरी पूर्ण

गोपाळ शेट्टी – ८४७०१

उर्मिला मातोंडकर – २७७७५

  • उत्तर पूर्व मुंबई मतदारसंघ – दुसरी फेरी पूर्ण

मनोज कोटक – १५४६०७

संजय दीना पाटील – १०२९६६

  • उत्तर मध्य मुंबई मतदारसंघ – दुसरी फेरी पूर्ण

पूनम महाजन – ५४९३२

प्रिया दत्त – ३१७५४

  • रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघ

विनायक राऊत (शिवसेना) – ५३४९२

निलेश राणे (स्वामप) – ३३१७७

विनायक राऊत २०,००० मतांनी पुढे

  • वाराणसी मतदारसंघातून पंतप्रधान मोदी २०,००० मतांनी, तर गांधीनगरमधून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा ५०,००० हजार मतांनी आघाडीवर
  • धुळे लोकसभा निकाल – दुसरी फेरी पूर्ण

डॉ.सुभाष भामरे (भाजप)- ३२९७०

कुणाल पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस) – २६०५७

अनिल गोटे – ०

सुभाष भामरे आघाडीवर

  • उत्तर मध्य मुंबई – पहिली फेरी पूर्ण

पूनम महाजन (भाजप) – २६,९८७

प्रिया दत्त (काँग्रेस) – १४,८२४

ए.आर.अंजारिया (वंचित बहुजन आघाडी) – २२०१

नोटा – ५५९

पूनम महाजन आघाडीवर

  • दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघ – पहिली फेरी पूर्ण

राहुल शेवाळे (शिवसेना) – २८८५८

एकनाथ गायकवाड (काँग्रेस) – १६८४०

संजय भोसले (वंचित बहुजन आघाडी) – ६३१७

नोटा – ८५३

राहुल शेवाळे आघाडीवर

  • मुंबईतील सर्व ६ मतदारसंघातून युती पुढे

  • अहमदनगर मतदारसंघातून सुजय विखे पाटील आघाडीवर
  • दक्षिण मुंबई – पहिली फेरी पूर्ण

    अरविंद सावंत (शिवसेना) – २८७२०

    मिलिंद देवरा (काॅंग्रेस) – १२८१५

    अनिल कुमार (वंचित बहुजन आघाडी) – ११४८

    नोटा – १०४३

  • उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून पूनम महाजन ८०६३ मतांनी आघाडीवर
  • पहिल्या फेरीत नागपूर मतदारसंघातून भाजप उमेदवार नितीन गडकरी १५९४० मतांनी आघाडीवर
  • नंदुरबार मतदार संघातून काँग्रेस उमेदवार के.सी. पाडवी ११,००० मतांनी आघाडीवर
  • हातकणंगले मतदार संघातून दुसऱ्या फेरीत शिवसेनेचे धैर्यशील माने ३,००० मतांनी पुढे
  • गोरेगाव येथील मतमोजणी केंद्रावर भोंगळ कारभार, नेमकी आकडेवारी मिळत नसल्याने गोंधळ
  • हिंगोली लोकसभा मतदार संघात पहिल्या फेरीत शिवसेना उमेदवार हेमंत पाटील १२,००० मतांनी पुढे
  • रायगड लोकसभा मतदारसंघात सुनील तटकरे १४०० मतांनी पुढे
  • मुंबई – दक्षिण मुंबईतून मतदारसंघातून अरविंद सावंत – ९५७८, मिलिंद देवरा – ४२४४
  • शिरूरमधून अमोल कोल्हे आघाडीवर
  • सातारा लोकसभा मतदासंघात पोस्टल मतदानात राष्ट्रवादी काँग्रेसचे उदयनराजे भोसले आघाडीवर
  • हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून खासदार राजू शेट्टी पहिल्या फेरीअखेर ४६ मतांनी आघाडीवर
  • ईशान्य मुंबई मतदारसंघातून भाजप उमेदवार मनोज कोटक तिसऱ्या फेरीला १३ हजार ९०० मतांनी पुढे
  • पुण्यात मतमोजणी ठप्प, काँग्रेसचा आक्षेप
  • काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या विजयासाठी त्यांच्या निवासस्थानाबाहेर हवन

  • भाजपचे उमेदवार नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील निवासस्थानाबाहेरील दृश्य

  • देशभरात लोकसभेच्या मतमोजणीला सुरुवात

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…तर मग वाजपेयींनी महाभेसळीचे नेतृत्त्व केले काय ?

News Desk

राहुल गांधी म्हणाले तर वाराणसीमधून निवडणूक लढवेन ! 

News Desk

विधानपरिषद सदस्य आणि महामंडळ अध्यक्षपदांची रिपाइंची मागणी

News Desk