HW News Marathi
राजकारण

सुरक्षेसाठी काँग्रेसकडून कृती दलाची स्थापना, सर्जिकल स्‍ट्राईकचा ‘हिरो’ करणार नेतृत्त्व

नवी दिल्ली | आगामी लोकसभा निवडणुका काहीच दिवसांवर येऊन ठेपलेल्या असताना काँग्रेसकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. काँग्रेसने राष्ट्रीय सुरक्षेसाठी एका कृती दलाची स्थापना केली असून या याची संपूर्ण जबाबदारी सर्जिकल स्‍ट्राईकमध्ये विशेष योगदान दिलेल्या माजी लेफ्‍टनंट जनरल डीएस हुडा यांच्यावर सोपविली आहे. डीएस हुडा हे या कृती दलाचे नेतृत्‍व करणार आहेत. ही कृती समिती देशाचे व्हीजन डॉक्‍युमेंट तयार करणार आहे.

“काँग्रेसकडून मला राष्‍ट्रीय सुरक्षेसाठी व्यापक व्हीजन तयार करू शकता का अशी विचारणा करण्यात आली होती. माझ्याही मनात याबाबत विचार सुरुच होते. त्‍यामुळे मी त्‍यांना होकार दिला. माझा काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा किंवा निवडणूक लढविण्याचा कोणताही विचार नाही”, असे हुडा यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, काँग्रेसकडून हुडा यांना देण्यात आलेल्या जबाबदारीबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगत आहेत.

सर्जिकल स्‍ट्राईकनंतर २ वर्षांनी हुडा यांनी सर्जिकल स्ट्राईकच्या अती प्रचाराबाबत नाराजी व्यक्त केली होती. “सर्जिकल स्‍ट्राईकचा इतका प्रचार करण्याची काही गरज नव्हती. हे ऑपरेशन भारतीय सैन्यासाठी निश्चितच महत्त्वाचे होते. मात्र त्याचे राजकीयीकरण करण्याची आवश्यकता नव्हती. हुडा यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पवार साहेबांनी देशाचे राजकारण करावे, मुख्यमंत्र्यांचा पवारांना सल्ला

News Desk

…तोपर्यंत मुख्यमंत्र्यांनी बोलावले तरी प्रीती भोजनाला जाणार नाही !

News Desk

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी RSSचे मुख्यालय आणि दीक्षाभूमीला दिली भेट

Aprna