मुंबई | “सार्वजनिक ठिकाणी बुरखा किंवा नकाब परिधान करणे गुन्हेगारी स्वरूपाचे कृत्य ठरेल, असे जाहीर करून श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रिपाल यांनी साहस व धैर्याचे दर्शन घडवले. रावणाच्या लंकेत जे घडले ते रामाच्या अयोध्येत कधी घडणार ?”, असा सवाल आज (१ मे) शिवसेनेने पंतप्रधान मोदींना विचारला आहे. भारतात देखील बुरखा, नकाबवर बंदी घातली जावी, अशी मागणीच शिवसेनेने केली आहे. दरम्यान, या प्रकरणी भाजप आणि शिवसेनेच्या भूमिकेत तफावत असल्याचे दिसत आहे. “बुरखा घालणारी प्रत्येक महिला दहशतवादी नसते”, असे म्हणत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शिवसेनेच्या या भूमिकेला विरोध केला आहे.
Union Minister, Ramdas Athawale on Shiv Sena's proposal to ban burqa in public places: Not all women who wear burqa are terrorists, if they are terrorists their burqa should be removed. It's a tradition & they have the right to wear it, there shouldn't be a ban on burqa in India. pic.twitter.com/DcIaL7IFLP
— ANI (@ANI) May 1, 2019
“बुरखा घालणारी प्रत्येक महिला दहशतवादी नसते. जर त्या दहशतवादी असतील, तर त्यांचा बुरखा काढण्यात यावा. मात्र, बुरखा हा त्यांच्या परंपरेचा एक भाग आहे. त्यामुळे बुरखा परिधान करणं हा मुस्लिम महिलांचा हक्क आहे. त्यामुळे देशात बुरख्यावर बंदी आणली जाऊ नये”, असे म्हणत रामदास आठवले यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.