HW News Marathi
राजकारण

भाजप प्रवेशानंतर प्रथमच मोहिते-पाटील आणि शरद पवार समोरासमोर येणार !

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आमदार हनुमंत डोळस यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहणार आहेत. शरद पवार सध्या महाराष्ट्रभर दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. अशातच अशी दुःखद घटना घडल्याने शरद पवार यांनी आजचे सर्व दौरे रद्द केले असून ते हनुमंत डोळस यांच्या अंत्यविधीला उपस्थित राहणार आहेत. हनुमंत डोळस हे कट्टर मोहिते पाटील समर्थक होते. मोहिते पाटलांचा निष्ठावान कार्यकर्ता त्यांना सोडून गेल्याने संपूर्ण मोहिते पाटील परिवार हनुमंत डोळस यांच्या अंत्यविधीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.तसेच हनुमंत डोळस हे राष्ट्रवादीचे आमदार होते.

राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये गेलेले रणजितसिंह मोहिते पाटील, भाजपच्याच जवळ असणारे विजयसिंह मोहिते पाटील आणि शरद पवार हे प्रथमच एकमेकांच्या समोर येणार आहेत. राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये गेलेल्या मोहिते पाटलांनी माढा मतदारसंघात चांगलीच लढत दिली आहे. त्याचप्रमाणे नरेंद्र मोदी यांची अकलूज येथे जाहीर सभा घेऊन त्यांनी प्रचाराची चांगलीच राळ उडवून दिली होती. याच सभेत नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांवर सडकून टीका केली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#LokSabhaElections2019 : कन्हैया कुमार बेगुसरायमधून निवडणुकीच्या रिंगणात

News Desk

Live Update : खुशखबर ! मराठा समाजाला अखेर यश

News Desk

मि जातीपातीसाठी नाही, तर महाराष्ट्राच्या मातीसाठी लढतोय | राज ठाकरे

News Desk