HW News Marathi
राजकारण

EVMHacking : आगामी निवडणुकांसाठी ईव्हीएमचाच वापर केला जाईल !

नवी दिल्ली | आगामी निवडणुकांसाठी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटचाच वापर केला जाईल. आम्ही पुन्हा देशाला मतपत्रिकांच्या युगात नेणार नाही, असे निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी स्पष्ट केले आहे. भारतात २०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये ईव्हीएम हॅकिंगबाबत भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांना कल्पना होती. म्हणून त्यांची हत्या झाली, असा गौप्यस्फोट एका अमेरिकन सायबर हॅकरकडून करण्यात आला होता, या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.

‘आपण ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट वापरणे सुरुच ठेवणार आहोत. याबाबत राजकीय पक्षाच्या टीकेला उत्तर देण्यास आम्ही तयार आहोत. त्याचप्रमाणे आम्ही देशाला पुन्हा मतपत्रिकांच्या युगात जाऊ देणार नाही. निवडणुकांच्या मतदानासाठी मतपत्रिकांचा वापर करण्याच्या मागण्यांना आम्ही घाबरणार नाही’ असे सुनील अरोरा यांनी सांगितले आहे. दरम्यान, “भाजपच नव्हे तर आम आदमी पक्षानेही ईव्हीएम हॅक करण्याचे तंत्रज्ञान आत्मसात केले असून, २०१५ साली दिल्लीत झालेल्या निवडणुकीत आपने त्याच्या जोरावरच विजय मिळवला”, असाही दावा या अमेरिकन हॅकर सय्यद सुजाकडून करण्यात आला होता.

दोनच दिवसांपूर्वी या प्रकरणी भारताच्या मुख्य निवडणूक आयोगाकडून देखील एका प्रसिद्धीपत्रकामार्फत यावर स्पष्टीकरण देण्यात आले होते. “निवडणुकांदरम्यान वापरले जाणारे ईव्हीएम पूर्णत: सुरक्षित आहे. हे ईव्हीएम भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडकडून तयार करण्यात आले आहे. ते कडेकोट देखरेखीत तयार होते. परंतु, या प्रकरणाचा वेगळा तपास केला जात असून याबाबत कायदेशीर कारवाई करण्याचा देखील विचार सुरु आहे,” असे निवडणूक आयोगाने म्हटले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राफेल कराराची माहिती राहुल गांधींना कशी मिळाली ?, अमित शहांचा सवाल

News Desk

संसदीय कार्यमंत्री विनोद तावडे यांनी घेतली विरोधी पक्ष नेत्यांची भेट

News Desk

मुख्यमंत्रीपदाच्या मागणीवर शिवसेना ठाम, उद्धव ठाकरे बोलण्याची शक्यता

News Desk