HW News Marathi
राजकारण

उद्धव ठाकरेंचे भाषण समजावून सांगणाऱ्याला मनसेकडून बक्षीस जाहीर

मुंबई | उद्धव ठाकरेंनी सोमवारी (२४ डिसेंबर) पंढरपुरात दिलेल्या भाषणाचा नेमका अर्थ समजावून सांगणाऱ्याला योग्य ते बक्षीस दिले जाईल, असे म्हणत मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची खिल्ली उडविली आहे. शिवसेना-भाजप युती करायची की नाही हे जनताच ठरवेल, असे उद्धव ठाकरेंचे वक्तव्य हे जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करणारे आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या या भाषणाचा अर्थ समजावून सांगणाऱ्यास मनसेकडून योग्य ते बक्षीस दिले जाईल, असे संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे.

उद्धव ठाकरेंचे पंढरपुरातील भाषण कोणालाही समजण्याच्या पलीकडचे आहे, असे म्हणत मनसेने या भाषणाची खिल्ली उडवली. उद्धव ठाकरे सोमवारी (२४ डिसेंबर) पंढरपूर दौऱ्यावर होते. यावेळी उद्धव ठाकरेंनी अयोध्या राम मंदिर, आगामी निवडणुका, सेना-भाजप युती, शेतकऱ्यांच्या समस्या, हिंदुत्व, पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका, विमा योजना घोटाळा, राफेल विमान खरेदी करार, मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, दुष्काळ, यासह अन्य अनेक मुद्द्यांचा आपल्या भाषणात समावेश केला होता. यावेळी त्यांनी भाजपवर देखील सडकून टीका केली. असंख्य मुद्द्यांचा समावेश असलेल्या उद्धव ठाकरेंच्या पंढरपुरातील या भाषणाबाबत सोशल मीडियावर देखील चांगलीच चर्चा रंगली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आता मुख्यमंत्री हॉस्पिटलमध्ये घेणार बैठक ?

News Desk

आगामी निवडणुकीत स्त्री हट्ट फडणवीसांना भोवणार का ?

News Desk

#LokSabhaElections2019 : काँग्रेस आज महाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार

News Desk