HW News Marathi
राजकारण

‘सामना’च्या अग्रलेखातील ‘बुरखा बंदी’च्या भूमिकेवर संजय राऊतांचे स्पष्टीकरण

मुंबई | श्रीलंकेत बॉम्बस्फोटानंतर राष्ट्रीय सुरक्षेसाठी मुस्लिम महिलांना बुरख्यावर बंदी घालण्यात आली आहे. यानंतर शिवसेनेच्या ‘सामना’मधील अग्रलेखात भारतात देखील बुरखा बंदी केली पाहिजे अशी भूमिका मांडली होती. निवडणुकीच्या काळात बुरखा बंदीच्या मागणीवरून राजकरण चांगलेच तापल्याचे चित्र दिसत असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माघार घेतली आहे.

बुरखा बंदीची मागणी शिवसेना किंवा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली नाही, असा खुलासा राऊत यांनी सामनाच्या रोखठोकमधून केली आहे. बुरखाबंदीची जितकी चर्चा श्रीलंकेत झाली नाही, त्यापेक्षा जास्त चर्चा आपल्या देशात झाली. येथे एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे की, ‘बुरखाबंदी’ची मागणी शिवसेना किंवा उद्धव ठाकरे यांनी केली नाही. श्रीलंकेतील घडामोडींवर एक विश्लेषण ‘सामना’ने छापले इतकाच हा विषय.रोखठोकमध्ये त्यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपच्या नेत्यांचे मनसुबे कधीही पूर्ण होणार नाहीत !

News Desk

राजस्थानमध्ये काँग्रेस सत्तेत आल्यानंतर १० दिवसात शेतकऱ्यांचे कर्जमाफ

News Desk

‘लुटो भाई लुटो…. लूट सको जितना लुटो… | धनंजय मुंडे 

swarit