नवी दिल्ली | साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या भाजपमध्ये प्रवेशापासून त्यांची उमेदवारी आणि तुरुंगात असताना त्यांच्यावर झालेले अत्यांचारपर्यंत प्रत्येक गोष्टी वादाच्या भोगवऱ्यात अडकली आहे. भाजपने साध्वी प्रज्ञा सिंह यांना भोपाळ मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. यानंतर सर्व स्तरातून साध्वी प्रज्ञासिंह यांचा निषेध केला जात आहे. निवडणूक आयोगाने साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी शहीद हेमत करकरे यांच्यावर अपमानास्पद टीकेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्या असून यावर चौकशी सुरू असल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले आहे.
Madhya Pradesh Chief Electoral Officer: Complaint received against BJP Lok Sabha candidate for Bhopal, Pragya Singh Thakur, for her comments on 26/11 martyr (former Mumbai ATS Chief Hemant Karkare). Cognizance taken. The matter is under enquiry. (File pic of Pragya Singh Thakur) pic.twitter.com/CiHl0a1WgD
— ANI (@ANI) April 19, 2019
आयपीएस असोसिएशने ट्विट करत सांगितले आहे की, अशोक चक्र पुरस्कार विजेते हेमंत करकरे यांनी दहशतवाद्यांविरुद्ध लढा देताना देशासाठी बलिदान दिले. भोपाळ लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा यांनी हेमंत करकरेंबद्दल केलेल्या अपमानास्पद विधानाचा आम्ही निषेध करत आहोत. सर्व शहिदांच्या बलिदानाचा आदर केला पाहिजे असे सांगत साध्वी यांच्या विधानावर भाष्य केले आहे.
Ashok Chakra awardee late Sri Hemant Karkare, IPS made the supreme sacrifice fighting terrorists. Those of us in uniform condemn the insulting statement made by a candidate and demand that sacrifices of all our martyrs be respected.
— IPS Association (@IPS_Association) April 19, 2019
निवडणुकीच्या काळात लष्कर आणि शहीद जवानांबद्दल कोणतीही टिप्पणी करू नये, असे निवडणूक आयोगाने स्पष्टपणे सांगितले आहे. हेमंत करकरे हे प्रामाणिक आणि कटीबद्ध अधिकारी होते. करकरे यांनी मुंबई दशतवादी हल्ल्यात लोकांना वाचवताना ते शहीद झाले आहेत, असे मत भोपाळ काँग्रेसचे उमेदवार दिग्विजय सिंह यांनी दिली आहे.
Digvijaya Singh on Pragya Thakur's comment on Mumbai ATS chief late Hemant Karkare: EC has clearly said that no political comments should be made on Army&martyrs. Hemant Karkare ji was an honest&committed officer who attained martyrdom for the people of Mumbai in a terror attack. pic.twitter.com/kJCz2p42b2
— ANI (@ANI) April 19, 2019
नेमके काय म्हणाल्या साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर
हेमंत करकरे यांनी म्हटले की, “मी काही करेन आणि पुरावे आणारच, मात्र साध्वीला नाही सोडणार”, ही त्यांची कुटिलता होती, हा देशद्रोह होता, धर्मविरुद्ध होता. ते मला विचारायचे की, “तुला सत्य जाणून घ्ये..न्यासाठी देवकडे जावे लागणार आहे. मी तेव्हा म्हटले की, तुम्हाला जर गरज वाटत असेल तर तुम्ही जाऊ शकता.” “मी करकरे यांना म्हटले होते की, तुझा सर्वनाश होणार, त्यांनी मला शीविगाळ केली. ज्या दिवशी मी तुरुंगात गेली तो दिवस सूतक सुरू होते. आणि जेव्हा दहशतवाद्यांनी करकरे यांना मारल्यानंतर सूतक संपले.”
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.