HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

शहीद जवानांच्या नावे मते मागितल्यामुळे मोदींविरुद्धच्या तक्रारीची आयोगाकडून दाखल

नवी दिल्ली | नवमतदारांनो, तुम्ही तुमचे पहिले मत हे  देशासाठी बलिदान देणाऱ्या जवानांना समर्पित करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या भाषणातून केले आहे. मोदींच्या या आवाहनावर विरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल करण्यात आली आहे. काँग्रेस आणि माकपने ही तक्रार दाखल केली असून पुलवामा हल्ल्यातील शहिदांच्या नावाने मोदींनी मताची मागणी केल्याचे या तक्रारीत त्यांनी म्हटले आहे. मोदींनी महाराष्ट्रातील लातूरमधील औसा येथील जाहीर सभेत म्हटले होते. निवडणूक आयोगाने मोदींच्या भाषणाची व्हिडिओ क्लिप मागविण्यात आली आहे.

पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये एअर स्ट्राईक करणाऱ्या जवानांना समर्पित करणार का ? तुमचे पहिले मतदान पुलवामामध्ये जे वीर शहीद झाले, त्या शहिदांना तुमचे पहिले मतदान समर्पित होईल का ? गरिबाला पक्के घर मिळण्यासाठी, शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहोचावे यासाठी तुमचे मत समर्पित होईल का ? असे म्हणत चक्क सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईकचा मुद्दा उपस्थित करत मोदींनी मते मागितली आहेत. आपले मतदान हे देशासाठी असेल, असेही मोदींनी म्हटले होते. यावरुन काँग्रेस आणि भाकपने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.

Related posts

‘‘काँगेसमुळेच दुःख, दैन्य, गरिबी आहे’’ असे वारंवार सांगणे हे बरोबर नाही !

News Desk

अण्णा हजारेंचे उपोषण अखेर मागे

News Desk

माणिकराव ठाकरेंचा उपसभापतीपदाचा राजीनामा

News Desk