HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

नवमतदारांनो, आपले पहिले मत हे वीर जवानांना समर्पित करा !

लातूर | काश्मीरचा प्रश्न हा काँग्रेसची देणगी असल्याच आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर आरोप केला आहे. मोदींनी आज लातुर औसा येथे युतीनंतर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे एकाच मंचावर एकत्र आले. नवमतदारांनो, पहिल मत हे वीर जवानांना समर्पित करण्याचे आवाहन मोदींनी केले आहे.

पंतप्रधान वेगळा पाहिजे त्यांच्या सोबत शरद पवार उभे आहेत. काश्मीर भारतापासून तोडू पाहणाऱ्यांना पवार पाठिंबा देत आहेत. पवार काँग्रेस सोबत आहात हे तुम्हाला शोभत नाही, अशी शब्दात मोदींनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर खोचक टीका केली आहे. युतीनंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर एकत्र आले आहेत.

 

मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

 • काँग्रेसने बाळासाहेबांचा मतदानाचा अधिकार काढून घेतला
 • दीड कोटी गरिबांना हक्काची घरे मोदींनी उपलब्ध केली
 • युतीनंतर पहिल्यांदा मोदी-ठाकरे एकाच मंचावर
 • आर्थिक मागावर्गाला १० टक्के आरक्षण
 • काश्मीरचा प्रश्न ही काँग्रेसची देणगी
 • काँग्रेस केवळ खोटी आश्वासने देते
 • शेतकऱ्यांच्या खात्यात सन्मान निधी जमा झाला
 • लातूर उस्मानाबाद जागेसाठी आज मोदींची प्रचार सभा
 • शिवरायांनी दिलेली शिकवण ही मार्गदर्शन
 • देशहितासाठी भाजप सरकार काम करते
 • एअर स्ट्राईकचे पुरावे पाकिस्तानने दिले
 • काश्मीर भारतापासून सोडून पाहणाऱ्यांबरोबर शरद पवार असल्याचे मोदींनी म्हटले आहे
 • शिवरायांचे पाणी व्यवस्थापनेचे काम देशासाठी आदर्श देणारे
 • पाणीटंचाईवर कायम स्वरुपी तोडगा काढणार, यासाठी येत्या काळात जश शक्ती मंत्रालय स्थापन करणार
 • शिवाजी महाराज एक महान प्रशासकीय
 • शहीदांचे बलिदान गरीब, शेतकऱ्यांचे हित लक्षात ठेवून मतदान करा, नवीन मतदान करणाऱ्यांना मोदींचे आवाहन
 • आम्ही सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक संकल्पपत्रात लिहिले नव्हते पण केले
 • छोट्या दुकानदारांना देखील पेन्शन देण्याचा आमचा संकल्प
 • असंघटीत कामगारांना 3000 रुपये मिळणार
 • काँग्रेस आघाडी शेतकऱ्यांना समजू शकले नाहीत
 • उद्धव ठाकरे माझ्या लहान भावासारखे असल्याचे मोदींनी सभेत म्हटले
 • काँग्रेसने 370 हटवण्याची भाषा ढकोसलापत्रात (जाहीरनाम्यात) केली आहे, तिच भाषा पाकिस्तान करत आहे
 • देशाची सुरक्षा, संवर्धन हाच संकल्प आहे

Related posts

आज त्यावर फक्त शिक्कामोर्तब होईल इतकेच!

News Desk

अखेर गोव्यात भाजपचे बहुमत सिद्ध

News Desk

पोलिसांनी पुरेशी सुरक्षा व्यवस्था न पुरविल्यामुळे हे घडले !

News Desk