HW News Marathi
राजकारण

अखेर राज ठाकरेंच्या सभेला मिळाली परवानगी

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मुंबईतील सभेला अखेर आज (२१ एप्रिल) परवानगी मिळाली आहे. मुंबईत २३ एप्रिल रोजी काळाचौकी येथील शहीद भगतसिंग मैदानात राज ठाकरेंची जाहीर सभा होणार आहे. यापूर्वी मनसेची सभा २४ एप्रिलला सभेची परवानगी मिळाली नाही. यानंतर आता २३ एप्रिल रोजी मुंबईतील पहिल्या सभेला परवानगी मिळाली आहे.

राज ठाकरेंनी राज्यभरातील नांदेड, सोलापूर, इचकरंजी, सातारा, पुणे आणि महाड येथे सभा घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याविरोधात प्रचाराची तोफ डागली आहे. यानंतर राज ठाकरेंनी त्यांचा मोर्चा आता मुंबईकडे वळविला आहे.

निवडणुकीच्या काळात सभेच्या परवानगीसाठी असलेली ‘एक खिडकी यंत्रणा’ यांच्याकडून परवानगीसाठी टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप मनसेकडून केला होता. लोकसभा निवडणुकीच्या प्रचार कालावधीत उमेदवारांना विविध परवानग्यांसाठी ‘एक खिडकी योजनें’तर्गत अर्ज करणे आवश्यक असते. त्यानुसार मनसेचा अर्ज दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातील एक खिडकी योजनेच्या समन्वय अधिकाऱ्यांकडे परवानगीसाठी पाठविण्यात आला होता. मात्र, त्यांनी मनसे निवडणूक लढवत नसल्याचे कारण देत सभेला परवानगी नाकारली. राज्यातील शेवटच्या टप्प्याचं मतदान 29 एप्रिल रोजी होत आहे. त्यापूर्वी आणखी तीन ते चार सभा राज ठाकरे घेण्याची शक्यता आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नाशिकहून निघालेला किसान मोर्चा स्थगित, सरकारकडून प्रमुख मागण्या मान्य 

News Desk

संजय राऊतांची ED कोठडी वाढणार की जामीन मिळणार?

Aprna

देशातील पहिले २ रुग्ण ‘कोरोना’मुक्त झाल्याबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आनंद

News Desk