HW News Marathi
अर्थसंकल्प

Budget 2019 LIVE Updates :  सोने,चांदी, पेट्रोल-डिझेल महागणार

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी २.० सरकारच्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज (दि.5) संसदेत सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पातून शेती, रेल्वे, रोजनागर, उद्याग, लघु उद्योग,रोजगार, ग्रामीण भारत, सिंचन आणि एमएसएमई क्षेत्रावर लक्ष केंद्र जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे आज सादर होणाऱ्या ‘पूर्ण अर्थसंकल्पा’कडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवाय, अर्थव्यवस्थेत सुधारणा आणण्यासाठी अर्थमंत्री सीतारामन कोणते निर्णय घेतात याविषयी उत्सुकता देखील आहे.

LIVE Updates

 

  • शेअर बाजार ३०० अंकानी कोसळला
  • सोने आणि अन्य मैल्यावान वस्तूंच्या उत्पान शुल्कात १० ते १२ टक्केने वाटले
  • पेट्रोल आणि डिझेल एक्साईज ड्यूटी १ रुपयाने वाढली
  • श्रीमंताना ३ ते ४ टक्के कर द्यावा लागणार,
  • वर्षाला बँक खात्यातून १ कोटीहून अधिकची रक्कम काढली तर २ टक्के कर द्यावा लागतो
  • छोट्या उद्योजकांना ५ लाखांपर्यंतच्या उत्पन्नाला कोणताही कर लागणार नाही
  • इनकम टॅक्स रिर्टनसाठी आता पॅनऐवजी आधारही वापरता येणार

  • घर खरेदी करणाऱ्याना दिलासा, ४५ लाखापर्यंत घर खरेदी घेतल्यानंतर ३.४ लाखाची सूट देणार आहे
  • इलेक्ट्रिक कार खरेदी करण्यासाठी खुशखबर, इलेक्ट्रिक कार खरेदी करतान सुट देण्यात येणार, इलेक्ट्रिक कारवर ५ टक्के सूट
  • करदात्यामुळे सरकारला अनेक ध्येय सरकारला गाठता आली
  • देशात लवकरच २० रुपयाचे नाणे चलनात येणार, १, २ आणि ५ रुपयाची नाणी नव्या रुपयात येणार आहे
  • नवी नाणी अंध लोकांनाही नाणे ओळखता येणार आहे.
  • मागील वर्षीपेक्षा यंदा 1 लाख कोटी एनपीएमध्ये घट

  • शेअर बाजार 118 अंकांनी घसरला

  • बचत गटासाठी १ लाख रुपयांचे कर्ज देणार
  • पारंपरिक नृत्य कलाकारांचे संवर्धन, कलाकारांना आर्थिक मदत करणार
  • सध्या जगभरात १८ देशात भारताचे दूतावसा नाही, त्या देशात राजकीय दूतावासाची नियुक्ती करणे

  • प्रधानमंत्री मानधन योजनेद्वारे देशातील कामगारांना पेंशन मिळणार आहे.
  • महिलांच्या विकाससाठी अनेक योजना केल्या आहे.
  • देशाच्या १७ व्या लोकसभेत ७८ महिला सध्या संसदेत असेने हा एक मोठा इतिहासच आहे.
  • देशातली महिलांवर लक्ष केंद्रत करून योजना अवलंबल्या आहेत.
  • नारी टू नारायणी…महिलांच्या विकासासाठी काम करणार

  • उजाला योजने अंतर्गत देशात ३५ कोटी एलईडी बंल्बचे वाटप गेले
  • परदेशी विद्यार्थ्यांसाठी स्टडी इन इंडिया कार्यक्रम सुरु करण्यात येणार आहे. पाच वर्षांपूर्वी जगातील २०० टॉप विद्यापीठांमध्ये एकही भारतीय विद्यापीठ नव्हते, आपण यावर काम केले,
  • विदेशी मुलांना भारतात चांगले शिक्षण घेता यावे यासाठी स्टडी इन इंडिया आणणार.
  • स्वच्छ भारत अंतर्गत 9 कोटी 6 लाख शौचालय मागील पाच वर्षात बांधण्यात आली. जवळपास 5 लाख 6 हजार गावं हगणदारीमुक्त झाली आहेत.

  • तरुणांना उद्योगासाठी त्वरित कर्ज उपलब्ध करून देणार, लघु, मध्यम उद्योगांना उभारी देणार, ५९ मिनिटात तरुणांना देणार कर्ज
  • शेतीच्या पायाभूत सुविधांवर भर देणार, मत्स्य व्यवस्थापनाच्या पायाभूत सुविधा मजबूत करणार. शेतीच्या पायाभूत सुविधांवर भर देणार. पुढील ५ वर्षात पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून १ लाख २५ हजार किमी रस्ते बांधणीचे लक्ष्य.

  • पंतप्रधान आवास योजनेतंर्गत १ कोटी ९५ लाख घरे बांधण्याचे उद्दिष्ट
  • जलशक्ती या नव्या मंत्रालयाकडून पाण्याच्या नियोजनावर भर देणार, आरोग्यदायी समाजाअंतर्गत आयुष्मान भारत, सुपोषित महिला आणि मुले तर नागरिकांच्या सुरक्षेला महत्त्वाचे स्थान देण्यात आलं आहे.
  • उज्ज्वला योजनेसाठी देशभरात प्रत्येक गावात गॅस सेवाप पुरविले जात आहे. आतापर्यंत ७ कोटी लोकांना गॅस जोडणी दिली आहे.
  • पंतप्रधान कर्मयोगी मानधन योजना जाहीर, छोट्या व्यापाऱ्यांना होणार मिळणार पेन्शन
  • जलमार्ग वाढवण्यावर आमच्या सरकारचा भर, वन नेशन, वन ग्रिडसाठी ब्लुप्रिंट तयार, रेल्वेमध्ये खासगी भागेदारीलाही (PPP मॉडेल) प्रोत्साहन

  • लघु, मध्यम उद्योगांना उभारी देण्यासाठी ३५०कोटी रुपये देणार. किरकोळ व्यापारांसाठी पेन्शन योजन आणणार. तीन कोटी दुकानदारांना पेंशन देण्याचा विचार आहे. त्यासाठी पंतप्रधान कर्मयोगी मानधन योजना जाहीर केली
  • देशातील प्रत्येक व्यक्तीला घर देण्याची योजना
  • छोट्या उद्योजकांना ५९ मिनिटात १ कोटी कर्ज देण्याची योजना
  • भारत आज रोजगार देणारा देश बनला आहे. आता पायाभूत सुविधा देण्यावर आमचा भर आहे. आम्ही ५ वर्षात १ लाख कोटी डॉलर अर्थव्यवस्थेत जोडले, पायाभूत सुविधा, डिजिटल अर्थव्यवस्थेवर भर देणार आहोत.

  • उडाण योजनेमुळे हवाई सेवा स्वस्त
  • रेल्वेसाठी ५० लाख कोटी रुपयांची गरज, भारतमाला प्रकल्पांतर्गत रस्त्यांचा चांगला विकास होणार, यातून छोट्या शहरांना जोडणार, भारतमाला प्रकल्पाने व्यवसायवृद्धी होणार आहे. रेल्वे प्रवास आणखी सोयीस्कर बनवणार.

  • इलेक्ट्रिक वाहनांच्या विकासावर भर देणार आहे.
  • इलेक्ट्रिक वाहनासाठी महत्त्वाच्या योजना राबविणार आहे
  • येत्या काळात मोदी सरकारचे ट्रिलीयन इकॉनॉमी होण्याचे लक्ष्य आहे.
  • स्वच्छ भारतासाठी आमच्या सरकारने भरीव कामगिर केली आहे.
  • मोदी सरकारने पाच वर्षात ३ ट्रिलीयन इकॉनॉमी झाली आहे.

  • देश १ ट्रिलीयन इकॉनॉमी होण्यास ५५ वर्ष लागले. परंतु आमच्या सरकारला अवघे ५ वर्ष लागेल. जनतेच्या मनात आमच्या सरकारबद्दल आशा आहे.
  • मोदी सरकारने गेल्या पाच वर्षात अनेक कामे केली

  • जनतेने पुन्हा आमच्या सरकारला संधी दिल्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो
  • निर्मला सीतारामन यांच्या अर्थसंकल्पीय भाषणाला सरुवात
  • अर्थमंत्री निर्मला सितारामन अर्थ संकल्प सादर घेऊन संसदेत दाखल

  • अर्थमंत्री निर्मला सितारामन या आपल्या टीमसोत संसदेत दाखल
  • निर्मला सीतारामन यांनी मोडला इतिहास, ‘बजेट ब्रिफकेस’ऐवजी लाल रंगाच्या चोपड्यात
  • केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन आणि अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर संसदेत पोहचले
  • निर्मला सितारामन संसद भवनमध्ये दाखल झाल्या आहे
  • निर्मला सितारामनयांनी र्थसंकल्पाची पहिल प्रत राष्ट्रपतींकडे सुपूर्त केली

निर्मला सिताराम यांनी राष्ट्रपती रामनाथ गोविंद यांची राष्ट्रपती भवता दाखल होऊन भेट घेतली.

अर्थसंकल्प लोसभेत सादर होण्यापूर्वीच शेअर मार्केटने वधारले

  • अर्थमंत्री निर्मला सीतारमण, अर्थ राज्य मंत्री अनुराग ठाकुर, अर्थ सचिव एससी गर्ग, मुख्य आर्थिक सलाहकार कृष्णमूर्ति सुब्रमण्यम आणि अन्यअधिकारी वित्त मंत्रालयच्या बाहेर दाखल, आज सकाळी ११ लोकसभेत अर्थसंकल्प मांडणार
  • निर्मला सितारामन अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी वित्तमंत्रालयात दाखल झाल्या
  • आज निर्मला सीतारामन संसदे सकाळी ११ वाजता. देशचे अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यापूर्वी वित अर्थ मंत्री अनुराग ठाकुर मंदिरात जावून देवाची पुजा केली

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

योगी सरकारचा ४ लाख ७० हजार ६८४ कोटींचा अर्थसंकल्प सादर

News Desk

PFB : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात

News Desk

PFB : मोदी सरकारच्या शेवटच्या अर्थसंकल्प अधिवेशनाची तारीख जाहीर

News Desk