HW Marathi
राजकारण

किती दहशतवाद्यांचा खात्मा झाला ते पाकिस्तानात स्वतः जाऊन शोधा !

नवी दिल्ली | “सत्तेसाठी राजकारण करू नका, देशाच्या विकासासाठी राजकारण करा. एअर स्ट्राईकमध्ये किती दहशतवादी मारले गेले याबाबत शंका असणाऱ्या काँग्रेस नेत्यांनी किती दहशतवाद्यांचा खात्मा झाला ते पाकिस्तानात स्वतः जाऊन शोधावे”, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी काँग्रेस नेत्यांना सांगितले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून विरोधकांकडून एअर स्ट्राईकमध्ये खात्मा करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची संख्या, पुरावे, छायाचित्रांची मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर राजनाथ सिंह यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. राजनाथ सिंह हे आसाममधील बीएसएफच्या बॉर्डर प्रोजेक्टच्या उद्धाटन कार्यक्रमात बोलत होते.

“भारतीय हवाई दल पाकिस्तानात जाऊन किती दहशतवाद्यांचा खात्मा झाला हे कशी मोजत बसेल ? हा खेळ मांडला आहे का ?”, असा संतप्त सवाल उपस्थित देखील राजनाथ सिंह यांनी यावेळी विचारला आहे. आज ना उद्या एअर स्ट्राईकमध्ये खात्मा करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची संख्या समोर येईल. “सध्या फक्त किती दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला याबाबतची माहिती पाकिस्तानच्या नेत्यांना आहे. एऩटीआरओने एअर स्ट्राईक झालेल्या ठिकाणी ३०० मोबाईलनेटवर्क ऍक्टिव्ह असल्याची खात्री केली आहे. जर यावर तुमचा विश्वास नसेल तर मग हे ३०० मोबाईल काय झाडाला लावले होते का ?”, असेही ते यावेळी म्हणाले.

Related posts

छत्रपतींच्या वेशात, महाराष्ट्राची कैफियत

News Desk

राज ठाकरे विरोधी गोटात सामिल होणार ?

Ramdas Pandewad

राज्यातील सिंचन घोटाळ्याला अजित पवार जबाबदार !

News Desk