HW News Marathi
राजकारण

शिवसेनेला मत देणे छिंदमला पडले महागात, शिवसैनिकांकडून मारहाण

मुंबई | छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा श्रीपाद छिंदम हा अहमदनगर महानगरपालिका निवडणुकीत अपक्ष म्हणून विजयी झाल्यानंतर त्याने शिवसेनेला आपले मत दिले आहे. मात्र, हे मत छिंदमला चांगलेच महागात पडले आहे. छिंदमचे हे मत नाकारत शिवसैनिकांनी छिंदमला सभागृहात मारहाण करून सभात्याग केला. अहमदनगर महानगरपालिका निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आल्यानंतर छिंदम नेमके कोणत्या पक्षाला मत देणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले होते.

भाजप आणि राष्ट्रवादीने मुद्दामहून शिवसेनेला बदनाम करण्यासाठी राजकीय खेळी खेळल्याचा आरोप करत शिवसेनेने श्रीपाद छिंदमचे मत नाकारले आहे. छिंदमने शिवसेनेचे उमेदवार बाळासाहेब बोराटे यांना आपले मत दिल्यानंतर शिवसैनिकांनी छिंदमला मारहाण सभागृहातच करत निवड प्रक्रियेवर बहिष्कार टाकला.

भाजपचे खासदार दिलीप गांधी व राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी मुद्यामहून शिवसेनेला बदनाम करण्यासाठी छिंदमला शिवसेनेला मत देण्यास सांगितले, असा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला आहे. दरम्यान, तरीही अखेरीस छिंदमचे मत शिवसेनेला मिळालेल्या मतांमध्ये गणण्यात आले आहे.

काहीच दिवसांपूर्वी अहमदनगर महानगरपालिका निवडणुकीत श्रीपाद छिंदमच्या विरोधात उभे राहिलेल्या निलेश म्हसे यांनी छिंदमला मिळालेल्या विजयालाच आव्हान देणारी याचिका निलेश म्हसे यांनी याबाबत जिल्हा न्यायालयात दाखल केली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंकजा मुंडेंना मोठा धक्का, ६३०० कोटींचे कंत्राट रद्द करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

News Desk

राष्ट्रवादीची मनसेला साथ नाही

News Desk

विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी कार्यकर्त्यांचा आग्रह !

News Desk