June 26, 2019
HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

भटिंडामधील मतदान केंद्रावर गोळीबार

नवी दिल्ली | पंजाबमधील भटिंडा येथे मतदान सुरू असताना दोन गटात हाणामारी झाली. भटिंडा येथील एका मतदान केंद्रबाहेर गोळीबार झाला. या हिंसाचारात एक जण जखमी झाले असून स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे.

भटिंडा हा पंजाबमधील प्रतिष्ठेचा मानला जाणारा मतदारसंघ आहे. या मतदारसंघातून केंद्रीय मंत्री हरसितकौर बादल या निवडणूक लढवत आहेत. दरम्यान भटिंडा तालवांडी सोबो येथील १२२ क्रमांकचा मतदान केंद्रावर दोन गटांत हाणामारी झाली. या हाणामारीत केंद्रावरील खुर्च्या टेबले देखील तोडण्यात आली. त्याचवेळी एका व्यक्तीने गोळीबार देखील केला. त्यानंतर मतदानकेंद्रावर एकच गोंधळ उडाला होता. त्यानंतर काही काळ मतदानाची प्रक्रीया थांबविण्यात आली होती. परंतु काही वेळाने मतदानाला पुन्हा सुरुवात करण्यात आली.

Related posts

#LokSabhaElections2019 : महाराष्ट्रात ९६ हजार व्हीव्हीपॅट यंत्र वापरणार

News Desk

सरकार बोलण्यात ऑनलाईन,कामात ऑफलाईन!: खा. अशोक चव्हाण

Ramdas Pandewad

लखनऊमध्ये प्रियांका गांधींचा दुर्गा अवतार

News Desk