HW News Marathi
राजकारण

राज ठाकरेंना काळे फासू : करणी सेनेचा इशारा

मुंबई | पद्मावतला देशभरातून विरोध होत असताना राज ठाकरे यांनी मात्र पद्मावतला पाठिंबा दर्शवला आहे. राज ठाकरे यांच्याकडून पद्मावतला सुरक्षा पुरवण्यात आली आहे.

दरम्यान, यामुळे मनसे राज ठाकरेंना काळे फासणार असा इशारा करणी सेनेचे अध्यक्ष अजय सिंह सेंगर यांनी दिला आहे. देशभरातील विविध शहरांमध्ये करणी सेनेचे कार्यकर्ते आंदोलन करत आहेत. आता हा वाद अधिकच चिघळण्याची शक्यता आहे. दरम्यान, प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून करणी सेनेच्या 50 कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. मनसेच्या सरचिटणीस व महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेच्या कार्याध्यक्षा शालिनी ठाकरे यांनी काल या वादावर मत व्यक्त केले होते.

मनेसेने ‘पद्मावत‘ला संरक्षणही देऊ केले आहे. यापूर्वी आम्हीही अनेक चित्रपटांना विरोध केला. मात्र, हा विरोध मुद्द्यांवर होता. चित्रपटाच्या आशयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आम्ही एकाही चित्रपटाला विरोध केला नाही, असे ठणकावून सांगतानाच ‘पद्मावत’ला होत असलेल्या विरोधाला मनसेने ठाम विरोध केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोदींच्या नव्या मंत्रिमंडळाची आज पहिली बैठक

News Desk

युतीचा निर्णय जाहीर होण्यापूर्वी भाजप-शिवसेनेच्या स्वतंत्र बैठका सुरु

News Desk

#RamMandir :अवघ्या २४ तासात उद्धव ठाकरे मुंबईला रिटर्न

News Desk