HW News Marathi
राजकारण

विधानसभेसाठी वंचित बहुजन आघाडीची पहिली यादी जाहीर

मुंबई | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आज (२४ सप्टेंबर) पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत २२ जागांवर उमेदवारांच्या नावे जाहीर केली आहेत. यामध्ये पुण्यातील जागांचाही समावेश आहे. वंचितच्या यादीत उमेदवारांच्या जातींचा ही उल्लेख केला आहे.

वंचित बहुजन आघाडीसोबत एमआयएमचा काडीमोड घेतल्यानंतर स्वबळाची तयारी केली. एमआयएमने आतापर्यंत त्यांच्या उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर केल्या आहेत. एमआयएमची पहिली यादी १० सप्टेंबरला जाहीर करण्यात आली होती. पहिल्या यादीत तीन उमेदवारांचा समावेश होता. यामध्ये पुण्याच्या वडगाव शेरी येथून डॅनियल रमेश लांडगे, मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघातून मुफ्ती मोहंमद इस्माईल, नांदेड (उत्तर) मधून मोहंमद फेरोज खान (लाला) यांची नावे जाहीर झाली होती.

तर दुसऱ्या यादीत यादीत चार जणांचा समावेश आहे. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथून अ‍ॅड. शंकर भगवान सरगर, सोलापूर मध्य मधून फारुक मोहंमद शाहबदी, सोलापूर दक्षिणमधून महिला उमेदवार देण्यात आल्या आहेत. सोफिया तौफिक शेख या उमेदवार आहेत. पुणे कॅन्टोन्मेंट येथून हिना शफिक मोमीन यांना उमेदवारी दिली आहे. हा मतदारसंघ अनुसूचीत जातीसाठी राखीव आहे. सर्व राजकीय पक्षांमध्ये एमआयएमने दोन याद्या जाहीर करून आघाडी घेतली आहे.

वंचित बहुजन आघाडीचे २२ उमेदवार

१) शिराळा मतदारसंघ – सुरेश जाधव (रामोशी)

२) करविर मतदारसंघ – डॉ.आनंद गुरव (गुरव)

३) दक्षिण कोल्हापूर मतदारसंघ – बबनराव उर्फ दिलीप पांडुरंग कावडे (गोंधळी)

४) कराड- दक्षिण मतदारसंघ – बाळकृष्ण शंकर देसाई (लोहार)

५) कोरेगाव मतदारसंघ – डॉ.बाळासाहेब चव्हाण (नंदिवाले)

६) कोथरूड मतदारसंघ – दिपक नारायण शामदिरे (कैकाडी)

७) शिवाजी नगर मतदारसंघ – अनिल शंकर कुर्‍हाडे (वडार)

८) कसबा पेठ मतदारसंघ – मिलिंद ई. काची (काची-राजपूत)

९) भोसरी मतदारसंघ – शहानवाला जब्बार शेख (छप्परबंद)

१०) इस्लामपूर मतदारसंघ – शाकिर इसालाल तांबोळी (तांबोळी)

११) पाथरडी-शेवगाव मतदारसंघ – किसन चव्हाण (पारधी)

१२) कर्जत-जामखेड मतदारसंघ – अरुण जाधव (कोल्हाटी)

१३) औसा मतदारसंघ – सुधीर शंकरराव पोतदार (सोनार)

१४) ब्रम्हपुरी मतदारसंघ – चंद्रलाल वकटुजी मेश्राम (ढीवर)

१५) चिमुर मतदारसंघ – अरविंद सांडेकर (माना)

१६) राळेगाव मतदारसंघ – माधव कोहळे (गोवारी)

१७) जळगाव मतदारसंघ – शेख शफी अब्दुल नबी शेख (पटवे-मुस्लिम)

१८) अहेरी मतदारसंघ – लालसू नागोटी (माडीया)

१९) लातूर शहर मतदारसंघ – मणियार राजासाब (मणियार)

२०) मोर्शी मतदारसंघ – नंदकिशोर कूयटे (भोई)

२१) वरोरा मतदारसंघ – एड.आमोद बावने (ढीवर)

२२) कोपरगाव मतदारसंघ – अशोक विजय गायकवाड (भिल्ल)

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधान मोदींपाठोपाठ शहांनी घेतले सोमनाथ मंदिरात दर्शन

News Desk

काँग्रेसचे नाराज आमदार अब्दुल सत्तार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

News Desk

येत्या 10 दिवसात गुलाम नबी आझाद नवी पक्षाची घोषणा करणार

Darrell Miranda