HW News Marathi
अर्थसंकल्प

Budget2019 : निर्मला सीतारामन यांनी मोडला इतिहास, ‘बजेट ब्रिफकेस’ऐवजी लाल रंगाच्या चोपड्यात

नवी दिल्ली | अर्थमंत्री निर्मला सीतारामन थोड्याच वेळात संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी २.० सरकार च्या पहिला अर्थसंकल्पात नेमके काय काय असणार याकडे संपर्ण देशाचे लक्ष लागले आहे. येत्या आर्थिक वर्षात देशाचा जीडीपी ७ टक्क्यांनी वाढेल, असा अंदाज काल आर्थिक पाहणी अहवाल सादर करताना सीतारामन यांनी व्यक्त केला. देशातील आतापर्यंत अर्थमंत्र्यांनी संसदेत अर्थसंकल्प लाल रंगाच्या ब्रिफकेसमधून संसदेत आण्याची प्रथा आहे. परंतु सीतारामन यांनी ही प्रथा मोडीत काढली असून सीतारामन लाल रंगाच्या मखमली कापडात त्याला चोपड्या देखील म्हणतात, या चोपड्यात अर्थसंकल्प गुंडाळून घेऊन अर्थ मंत्रालयात आल्या.

संसदेच्या आवारात त्यांनी त्यांच्या टीमसोबत फोटोही काढला. त्यावेळी लाल रंगाच्या ब्रिफकेसमध्ये अर्थसंकल्प आणण्याऐवजी लाल रंगाच्या मखमली कपड्यात त्या अर्थसंकल्प घेऊन आल्या. यामुळे सितारामन यांच्या लाल रंगाचा मखमली कपडड्यावर ‘अशोक स्तंभ’ दिसून आले. आजपर्यंत चालत आलेल्या प्रथा-परंपरेला बाजूला सीतारामन यांनी नवीन पायंडा पाडल्याने संसदेत आणि संसदेच्याबाहेर त्याची जोरदार चर्चा सुरू होती. महत्त्वाचे म्हणजे अर्थमंत्री म्हणून हा निर्मला सीतारामन यांचा हा पहिलाच अर्थसंकल्प असेल. त्यामागील कारण मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमणियन यांनी सांगितले. ‘अर्थसंकल्पाला आपण चोपड्या म्हणतो. चोपड्या लाल रंगाच्या कपड्यात असतात. ती आपली परंपरा आहे,’ असे सुब्रमणियन म्हणाले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#Budget2019 : यंदाच्या अर्थसंकल्पात नोकरदारांना मिळणार खुशखबर ?

News Desk

PFB : पीयुष गोयल अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार ?

News Desk

#Budget2019 : शेतकऱ्यांसाठी मोदी सरकार काय करणार ?

News Desk