HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

काँग्रेससाठी देशाची जनता तर भाजपसाठी केवळ आपला चेहरा महत्त्वाचा !

नवी दिल्ली | आगामी लोकसभा निवडणुकांसाठी भाजपने सोमवारी (८ मार्च) आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. आपल्या जाहीरनाम्याला भाजपने संकल्प पत्र असे नाव दिले आहे. २०२२ सालापर्यंत ७५ संकल्प पूर्ण करण्याचे आश्वासन भाजपकडून देण्यात आले आहे. दरम्यान, काँग्रेसकडून भाजपच्या या जाहीरनाम्यावर सडकून टीका केली आहे. “जाहीरनाम्याचा फोटोच असे स्पष्टपणे दर्शवितो कि काँग्रेससाठी देशाची जनता महत्त्वाची आहे. तर भाजपसाठी केवळ आपला चेहरा महत्त्वाचा आहे. आमच्या जाहीरनाम्यात देशातील जनतेचा विचार दिसतो आहे. तर भाजपच्या जाहीरनाम्यात फक्त एकाच व्यक्तीची ‘मन की बात’ दिसते आहे. आता देश आपल्या मनाचा निर्णय घेईल”, असे म्हणत काँग्रेसकडून भाजपच्या संकल्प पत्रावर निशाणा साधण्यात आला आहे.

काँग्रेसने देखील २ एप्रिल रोजी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्याचे नाव ‘हम निभाएंगे’ असे आहे. “पंतप्रधान मोदींनी दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत. परंतु, आम्ही जी आश्वासने देऊ ती पूर्ण करणार आहे”, असे राहुल गांधींनी यावेळी सांगितले होते. त्यावेळी भाजपकडून देखील काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर सडकून टीका करण्यात आली होती. “जर काँग्रेस केंद्रात सत्तेत आले तर देशद्रोहाचे कलम रद्द करू”, असे काँग्रेसच्या जाहीरनाम्यात सांगण्यात आले आहे. “काँग्रेसला भारताचा तिरंगा जाळणाऱ्या, जय हिंदऐवजी ‘भारत तेरे तुकडे होंगे’ अशा घोषणा देणाऱ्यांबद्दल सहानुभूती आहे”, अशी टीका पंतप्रधान मोदींनी केली होती.

Related posts

सरकार जर स्वच्छ आणि पारदर्शी असेल तर आपण जेपीसीला का घाबरतो ?

News Desk

राफेल कराराच्या मुद्दयावरून राजकारण पेटले

#LokSabhaElections2019 :भाजपच्या पहिल्या यादीत मोदी, गडकरींसह सुजय विखे-पाटील यांना स्थान मिळणार ?

News Desk