HW News Marathi
राजकारण

“…चुकीचे परिणाम राजाला नाही राज्याला असतात”, उद्धव ठाकरेंचा NIT घोटाळ्यावरून मुख्यमंत्र्यांना टोला

मुंबई | “राजा तु चुकतो आहे. त्याच्या चुकीचे परिणाम राजाला नाही राज्याला असतात”, असा टोला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना नागपूर इन्व्हेस्टमेंट ट्रस्टचा (NIT) घोटाळ्यावरून लगावला आहे. विधीमंडळाच्या अधिवेशनात विरोधकांनी मुख्यमंत्र्यांनी गैरनियमांनी आपल्या जवळच्या माणसाला 83 कोटींचा भूखंड देण्याचा प्रयत्न केला होता. या मुद्दयावर विधीमंडळात विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली होती. यानंतर हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस पार पडला. हिवाळी अधिवेशनासाठी उद्धव ठाकरे हे नागपूरमध्ये आले आहेत. हिवाळी अधिवेशनाचे कामकाज पार पडल्यानंतर उद्धव ठाकरेंनी आज (20 डिसेंबर) माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यावर टीका केली.

उद्धव ठाकरे म्हणाले, “राजा तु चुकतो आहे. त्याच्या चुकीचे परिणाम राजाला नाही राज्याला असतात. निधीचा मुद्दा पण महत्वाचा. जनेतेच्या करातून हा शासकीय निधी त्यात असमानता असू नये. निर्णयाला स्थगिती देण्याची न्यायालयाला का गरज वाटली. नागपूर सुधार प्रन्यासने नकार दिला ही वस्तुस्थिती. न्यायालयाचे मित्र यांनी न्यायालयाला हस्तक्षेपाच्या बाबतीत सांगितले. उपमुख्यमंत्र्यांनी जे कथानक सांगितले ते एकंदर निर्णय बघता अनुत्तरित आहे. अनिल परब यावर शास्त्रीय पध्दतीत सांगतील.”

ग्रामपंचायतीच्या निकालावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “पहाड तर खोदलाच ना तेव्हाच हे बाहेर आले. उद्या बघा विधानसभेत हा विषय येईल. ग्रामपंचायत निवडणुकांचे वातावरण वेगळे. एका पक्षाचे यश अपयश अस काहीच नसत. मी निवडून आले त्यांचे अभिनंदन. ग्रामपंचायत यश अपयश हा बालिशपणा. स्थानिक एकत्र येऊन ती निवडणुक लढतात.”

मुख्यमंत्र्यांच्या एनआयटी घोटाळ्यावर उद्धव ठाकरेंचे सवाल

“आमच्या काळात नागपूर सुधार प्रन्यास प्रकरण झाले तेव्हा मविआ सरकार असले तरी मंत्री तेच आहेत. चूक ते चुकच. त्यांना तुरूंगात टाकले मग आता मुख्यमंत्र्यांना तुरूंगात टाकायचे आहे का? उगाच गुंतागुंत करु नका हा न्यायप्रविष्ट विषय. यांच्यावर आरोप झाले की इतरांकडे बोट दाखवायचे. न्यायालयात विषय असल्याने चौकशी समितीचा प्रश्नच नाही. हा विषय लावून धरणारच. काहीतरी थातुरमातुर दिले. मग सरकारने हे उत्तर न्यायालयात का नाही दिले?”, असे अनेक सवाल उद्धव ठाकरेंनी केले आहे.

‘मविआ’च्या महामोर्चावर फडणवीसांच्या टोलावर उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या महामोर्चावर टीका करताना नॅनो मोर्चा असा टोला लगावला होता. उपमुख्यमंत्र्यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले, “कर्नाटक, गुजरात, तेलंगणा आमच्यावर हक्क सांगताहेत. फडणवीस साईज आमचा मोर्चा होता अस माझ उत्तर आहे.”

 

Related posts

दिवाळी पहाट कार्यक्रमाला पूर्व उपनगरात उत्स्फूर्त प्रतिसाद

Gauri Tilekar

मुनगंटीवार वनमंत्री झाल्यापासून वाघ मारण्याच्या संख्येत वाढ !

News Desk

#LokSabhaElections2019 : आज घराघरात “अबकी बार चौकीदार चोर है”च्या घोषणा !

News Desk