मुंबई | राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजा यांच्याबद्दल केलेल्या विधान आणि महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्याविरोधात महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) आणि त्यांच्या मित्र पक्षाचा 17 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता भव्य आणि विराट काढण्या येणार असल्याची घोषणा महाविकास आघाडीच्या वतीने माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केली आहे. महाविकास आघाडीचा हा मोर्चा 17 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता जिजामाता उद्यान ते आझाद मैदान असणार असल्याची माहिती उद्धव ठाकरेंनी आज (5 डिसेंबर) महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेतून दिली आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, “तीन प्रमुख पक्षांची बैठक झाली. बैठक झाल्यानंतर आमचे जे मित्रपक्ष आहेत. त्या सर्व मत्रिपक्षांसोबत स्वत: अजित पवार, बाळासाहेब थोरात आणि मी पण काही जणांशी बोलल्यालो आहे. या सर्वांनी एकजूट दाखवण्याची वेळ आलेली आहे. हे मान्य केलेले आहे. आणि ही एकजूट दाखवण्यासाठी येत्या 19 डिसेंबरला विधानसभेचे हिवाळी अधिवेशन नागपूर येते होणार आहे. त्या अधिवेशन सुरू होण्याआधी 17 तारखेला शनिवारी मुंबईमध्ये महाविकासआघाडीचा नव्हे, तर मी सर्वांना आव्हान करतोय म्हणजे विनंती करोय. ज्यांना ज्यांना पटलेले नाही, ज्यांना महाराष्ट्राचा अपमान सहन होत नाही. त्या सर्वांना मी आमंत्रण देतोय, चला आपण महाराष्ट्र म्हणजे काय?, महाराष्ट्राचे एकजूटचे काय?, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचे काय आणि महाराष्ट्राच्या शक्तीचे एक विराट दर्शन या महाराष्ट्र द्वेषाना दाखवू या. 17 तारखेला सकाळी 11 वाजता जिजा माता उद्यान ते आझाद मैदान असा एक अतिभव्य मोर्चा महाविकास आघाडीच्या वतीने काढत आहोत. त्या मोर्चामध्ये जे भाजपमधील छत्रपती प्रमे आहेत. महाराष्ट्र प्रेमी आहेत. ज्यांना महाराष्ट्राच्या आदर्शांचा झालेला अपमान पट नाहीये. त्यासुद्धा मी आमंत्रित करत आहे. सगळ्यांनी या कारण हा केवळ राजकीय लढा नाहीय. हा आपल्या राज्याचा, स्वाभिमानाचा आणि अस्मितेचा प्रश्न आहे. असेच नेभळट राजकारण या पुढे चालू राहिले. तर महाराष्ट्राला उद्या कोणी विचारणार नाही. आणि जो हिंमतवान महाराष्ट्र आहे. शूरवीरांचा महाराष्ट्र आहे. तो दिन दुबळा होऊन जाईल. आम्ही महाराष्ट्र दिन दुबळाहोऊ देणार नाही. आणि त्यासाठी येत्या 17 तारखेला अति भव्य आणि विराट स्वरुपाचा मोर्चा जिजा माता उद्यान ते आझाद मैदान काढायचे आम्ही ठरविलेले आहे.”
महाराष्टाचा अपमान करणाऱ्यांविरोधात मोर्चा
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “हा मोर्चा फक्त एका मुद्यासाठी म्हणजे राज्यपाल ठरवा यासाठी आहे का?, तर नाही. ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्राचा अपमान केला. त्या सर्वांच्या विरोधात 17 तारखेला मोर्चा काढणार आहे. हा मोर्चा ही एक सुरुवात असेल. आधी सुरुवातील एक इशारा देऊन बघू या. नाही जमले तर एक एक पाऊल पुढे टाकायला काय हरकत आहे. 17 तारखेला महाराष्ट्राचा अपमान करणारे जी लोक आहेत. त्यांच्याविरोधात ताकद एकवूट दाखवण्याची गरज आहे.”
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.