HW News Marathi
राजकारण

#ArunJaitley : विद्यार्थी नेते ते अर्थमंत्री पदापर्यंतचा थक्क करणारा जीवन प्रवास

नवी दिल्ली | माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचे आज (२४ ऑगस्ट) निधन झाले आहे. जेटलींवर ९ ऑगस्टपासून दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचार घेत होते. जेटलींना श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. एम्सकडून त्यांचे १२ वाजून ७ मिनिटांनी निधन झाल्याचे जाहीर करण्यात आले. जेटली यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते.

विद्यार्थी नेते ते अर्थमंत्री पदापर्यंतचा अरुण जेटलींचा प्रवास थक्क करणारा आहे. जेटली यांचा जन्म २८ डिसेंबर १९५२ रोजी झाला होता. अरुण जेटली हे अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात कायदेमंत्री आणि जलवाहतूकमंत्री होते. २००० पासून ते राज्यसभेचे सदस्य होते. ३ जून २००९ रोजी त्यांची राज्यसभेत विरोधी पक्षनेते म्हणून निवड झाली होती.

असा आहे अरुण जेटलींचा जीवन प्रवास

  • अरुण जेटली यांचा जन्म २८ डिसेंबर १९५२ रोजी झाला.
  • त्यांचे वडील महाराज किशन जेटली हे प्रसिद्ध वकील होते. त्यांच्या आईचे नाव रतन प्रभा जेटली होते.
  • अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात कायदेमंत्री आणि जलवाहतूकमंत्री होते.
  • साल २००० पासून ते राज्यसभेचे सदस्य आहेत.
  • २००९ साली ३ जून रोजी त्यांची राज्यसभेतील विरोधीपक्षनेतेपदी नियुक्ती झाली होती.
  • १९६०-६९ दरम्यान सेंट झेवियर्स स्कूल, नवी दिल्ली येथे त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले.
  • १९७३ मध्ये श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्स, कॉमर्समधून वाणिज्य विषयात पदवी संपादन केली.
  • १९७७ मध्ये दिल्ली विद्यापीठातून त्यांनी कायदा पदवी पास केली.
  • सत्तरच्या दशकात ते दिल्ली विद्यापीठात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (एबीव्हीपी) विद्यार्थी कार्यकर्ते होते.
  • १९७४ मध्ये विद्यापीठ विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष झाले.
  • १९८२ साली त्यांनी संगीता जेटली यांच्याशी लग्न केलं. त्यांना दोन मुले आहेत. मुलाचं नाव रोहन तर मुलीचं नाव सोनाली आहे.
  • १९८९ मध्ये त्यांची अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हणून नियुक्ती झाली.
  • जानेवारी १९९० मध्ये त्यांना दिल्ली उच्च न्यायालयाने वरिष्ठ अधिवक्ता म्हणून नियुक्त केले.
  • जेटली १९९१ पासून भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य आहेत.
  • १९९९ च्या लोकसभा निवडणुकींच्या काळात ते भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते होते.
  • १३ ऑक्टोबर १९९९ रोजी अटल बिहारी वाजपेयी सरकारमध्ये जेटली यांनी ‘सूचना और प्रसारण राज्य मंत्री’पदी नियुक्ती झाली.
  • मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळामध्ये अरुण जेटली हे केंद्रीय मंत्रिमंडळात अर्थमंत्री होते. 

    मागील अनेक दिवसांपासून अरूण जेटलींची तब्येत खराब असल्याने, त्यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील कॅबिनेट मंत्रिमंडळात सहभागी होण्यास नकार दिला होता. त्यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून आपला निर्णय कळवला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात लवकरात लवकर स्थिर सरकार स्थापन करण्याची गरज !

News Desk

“काहींची भाषणे फारच लांबली होती, नको इतकी लांबली…”, अजित पवारांचा शिंदेंना टोला

Aprna

अंबाजोगाईतील डीवायएसपींची बदली, तर ग्रामीणचे पीआय सस्पेंड; उपमुख्यमंत्र्यांची घोषणा

Aprna